AUS vs ENG 1st ODI: मिचेल स्टार्कने काय इनस्विंगर टाकला राव, जेसन रॉयला चान्सच मिळाला नाही, पहा VIDEO
AUS vs ENG 1st ODI: स्टार्कच्या या चेंडूसमोर जेसन रॉय काहीच करु शकला नाही, पहा VIDEO
एडिलेड: नव्या चेंडूचा सामना करणं इतकं सोप नसतं. मग चेंडू भले लाल असो किंवा सफेद. गोलंदाजाने चेंडू योग्य लेंग्थ आणि लाइनवर टाकला, तर फलंदाज लाचारच होतो. जेसन रॉय सोबत सुद्धा असंच काहीस घडलं. एडिलेड ओव्हलमध्ये पहिला वनडे सामना सुरु आहे. जेसन रॉय फक्त 6 रन्सवर आऊट झाला. रॉयने 11 चेंडूंचा सामना केला. मिचेल स्टार्कने त्याची इनिंग संपवली. स्टार्कने टाकलेला चेंडू खूपच लाजवाब होता. त्यासमोर रॉय काहीच करु शकला नाही.
फुल लेंग्थ चेंडूवर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न
जेसन रॉय मिचेल स्टार्कच्या जबरदस्त इनस्विंगरवर बोल्ड झाला. पाचव्या ओव्हरमध्ये ही कमाल झाली. रॉयने स्टार्कच्या फुल लेंग्थ चेंडूवर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू शेवटच्या क्षणी इन स्विंग झाला. रॉय काहीच करु शकला नाही. त्याचा मिडल स्टम्प उडाला. स्टार्कच्या जबरदस्त इनस्विंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
इंग्लंड टीमची टॉप ऑर्डर फ्लॉप
T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंड टीमची टॉप ऑर्डर एडिलेड वनडेमध्ये फ्लॉप झाली. ओपनर फिल सॉल्ट, जेम्स विंस, सॅम बिलिंग्स आणि जेसन रॉय फार काही करु शकले नाहीत.
रॉयने 6, सॉल्टने 14 धावा केल्या. विंस 5 रन्सवर कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. सॅम बिलिंग्स व्यक्तीगत 17 धावांवर स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर आऊट झाला. सगळ्या विकेट्समध्ये स्टार्कने घेतलेला विकेट खूप महत्त्वपूर्ण होता. सोशल मीडियावर या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
STARC!
A trademark inswinger from the big quick! #AUSvENG#PlayOfTheDay | #Dettol pic.twitter.com/94zYtKeNOE
— cricket.com.au (@cricketcomau) November 17, 2022
स्टार्कमुळे शाहीन शाह आफ्रिदीची आठवण
टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये शाहीन शाह आफ्रिदीने अशा पद्धतीचा चेंडू टाकला होता. शाहीनने एलेक्स हेल्सला कमालीच्या इनस्विंगरवर बोल्ड केलं होतं. या विकेटचा इंग्लंडवर फार परिणाम झाला नाही. बेन स्टोक्सच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता.