IND vs ENG: चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल, ‘या’ खेळाडूला नेमलं उपकर्णधार

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात झालेल्या तीन कसोटी सामन्यांपैकी एक सामना अनिर्णीत सुटला असून इतर एक एक सामना दोन्ही संघानी जिंकला आहे. आता चौथ्या सामन्याआधी इंग्लंडने संघात एक मोठा बदलाव केला आहे.

IND vs ENG: चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल, 'या' खेळाडूला नेमलं उपकर्णधार
इंग्लंड क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 5:50 PM

लंडन: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथी कसोटी गुरुवारपासून (2 सप्टेंबर) ओवलच्या मैदानावर (Oval Test) खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ मालिकेत 1-1 च्या बरोबरीत असल्याने चौथी कसोटी महत्त्वाची असेल. या महत्त्वाच्या कसोटीपूर्वीच इंग्लंड संघाने एक मोठा बदल केला आहे. इंग्लंडने त्यांचा उपकर्णधार म्हणून अष्टपैलू स्टार क्रिकेटर मोईन अली (Moeen Ali) याची नेमणूक केली आहे.

मालिका सुरु होण्यापूर्वी संघातही नसणारा मोईन आता थेट संघाचा उपकर्णधार झाला आहे. त्याला यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरच्या जागी उपकर्णधार म्हणून नेमलं आहे. बटलरला मुलं होणार असल्याने त्याने सुट्टी घेतली आहे. त्यामुळे तो उर्वरीत कसोटी मालिकेत खेळणार नाही. दरम्यान बेन स्टोक्स याने माघार घेतल्यानंतर बटलरला उपकर्णधार करण्यात आलं होतं. त्यानंतर आता मोईनला करण्यात आलं आहे.

आतापर्यंत मोईनची दिलासादायक कामगिरी

फिरकीपटू मोईनने आतापर्यंत इंग्लंड संघाकडून कसोटीमध्ये 63 सामन्यातं पाच शतक ठोकत 2 हजार 879 धावा केल्या आहेत. त्याने 193 विकेट्सही घेतल्या असून आता सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो चांगली कामगिरी करत आहे. त्याने दोन सामन्यांत 3 डावांमध्ये 48 धावा करत 4 विकेटही घेतल्या आहेत. दरम्यान आगामी चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ओवलच्या मैदानावर फिरकीपटूंना अधिक फायदा असल्याने मोईन अलीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हे ही वाचा :

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

(Moeen ali appointed england vice captain for oval test)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.