MS Dhoni ने ज्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याचीच दुसऱ्या सामन्यात कमाल, तोच चेन्नईचा खरा चॅम्पियन VIDEO
CSK vs LSG IPL 2023 : दुसऱ्या मॅचमध्ये संधी मिळताच त्याने सोनं केलं. आयपीएलच्या सहाव्या सामन्यात त्याने चेन्नईच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. चेन्नई सुपर किंग्सचा यंदाच्या सीजनमधला हा पहिला विजय आहे.
CSK vs LSG IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन एमएस धोनीने ज्या खेळाडूवर पहिल्या मॅचमध्ये विश्वास दाखवला नाही, त्याने दुसऱ्या मॅचमध्ये कमाल केली. आयपीएलच्या सहाव्या सामन्यात त्याने चेन्नईच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. ही चर्चा होतेय माईन अलीची. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मोईन अलीने बॅटने विशेष कमाल केली नाही. पण बॉलिंगमध्ये त्याने कमाल केली. एमएस धोनीने त्याच्या हाती चेंडू सोपवताच त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. मोईन अलीने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 26 धावा देऊन 4 विकेट काढल्या.
मोइन अलीच्या या कामगिरीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला 12 धावांनी हरवलं. मोईन अलीला पहिल्या सामन्यात धोनीने गोलंदाजी दिली नव्हती. गुजरात टायटन्स विरुद्ध त्याचा वापर केला नाही. चेन्नईच्या पराभवानंतर मोईन अलीला धोनीने गोलंदाजी का दिली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. कारण मोईन अली बॉलिंगसाठी अनफिट असल्याची कुठलीही बातमी नव्हती.
विकेट काढताना टायमिंग महत्वाच
मोईन अलीने लखनौच्या चार मोठ्या फलंदाजांना आऊट केलं. काइल मायर्स, केएल राहुल, क्रृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉयनिस या चार विकेट मोईन अलीने काढल्या. महत्वाच म्हणजे धोनीच्या चेन्नईची वाटचाल पराभवाच्या दिशेने चालली होती, त्यावेळी त्याने या चार विकेट काढल्या.
मोईन अलीची मॅजिक
मोईन अली पावरप्लेच्या लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला. लखनौने पावरप्ले संपण्याआधीच 79 धावा केल्या होत्या. मोईन अली गोलंदाजीसाठी येताच त्याने कमाल केली. या ऑफ स्पिनरने पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर काइल मेयर्सला कॉन्वेच्या हातून कॅचआऊट केलं. मेयर्सचा विकेट चेन्नईसाठी महत्वाचा ठरला. या डावखुऱ्या ओपनरने 22 चेंडूत 53 धावा फटकावल्या होत्या. सिक्सची संधी देऊन जाळ्यात अडकवलं
त्यानंतर मोइन अलीने 8 व्या ओव्हरमध्ये लखनौचा कॅप्टन केएल राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. राहुलने 18 चेंडूत 20 धावा केल्या. मिडविकेटला ऋतुराज गायकवाडने राहुलची कॅच पकडली. क्रृणाल पंड्या सुद्धा मोईन अलीच्या जाळ्यात अडकला. त्याला सिक्स मारण्याची संधी देऊन लॉन्ग ऑनला जाडेजाच्या हातून झेलबाद केलं.