पहिल्या पत्नीशी वादानंतर मोहम्मद शमी दुसरे लग्न करणार ? सोशल मीडियावर फोटोतून…

Mohammed Shami | पाकिस्तानी खेळाडू शोयब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची बातमी खरी ठरली. शोयब मलिकने तिसरे लग्न केले. आता भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. कारण त्याने पोस्ट केलेले फोटो...

पहिल्या पत्नीशी वादानंतर मोहम्मद शमी दुसरे लग्न करणार ? सोशल मीडियावर फोटोतून...
mohammed shami
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 12:38 PM

मुंबई, दि.21 जानेवारी 2024 | पाकिस्तानी खेळाडू शोयब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची बातमी खरी ठरली. शोयब मलिकने तिसरे लग्न केले. आता भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. मोहम्मद शमी सध्या जखमी असल्यामुळे टीम इंडियात नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमी दिसणार नाही. त्याच्या टाचेवर दुखापत झाली आहे. त्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आता टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर मोहम्मद शमी दुसरे लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पहिली पत्नी हसीनशी शमी याचा वाद सुरु आहे. तसेच बंगाली कलाकार पायल घोषने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता.

मोहम्मद शमी याचे ट्विट अन् चर्चा

मोहम्मद शमी याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहे. त्या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावर फोटा आहे. गळ्यात माळा आहेत. त्याने शॉल परिधान केली आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या सर्व मित्रांचे धन्यवाद. तुम्ही सर्वांनी माझे खूप स्वागत केले.’ शमी याच्या या पोस्टनंतर चर्चा सुरु झाली आहे. एक यूजरने कॉमेंट करत म्हटले की, ‘शमी भाई दूसरी शादी तो नहीं कर रहे हैं?’ दुसऱ्या यूजरने म्हटले, ‘ये क्या है शमी भाई? आप दोबारा शादी तो नहीं कर रहे हैं?’

पहिल्या पत्नीशी वाद

मोहम्मद शमी याचे पहिले लग्न 2014 मध्ये हसीन सोबत झाले होते. दोघे चार वर्ष एकत्र होते. त्यानंतर 2018 मध्ये हसीन त्याच्यापासून वेगळी झाली. यावेळी हसीन हिने शमी याच्यावर गंभीर आरोप केले. त्याच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यानंतर शमीची कारकीर्द धोक्यात आली होती. तो नैराश्यात गेला होता. परंतु आता त्याने नव्याने जीवन सुरु केले.

पायल घोषकडून ऑफर

महम्मद शमी यांच्या विश्वचषकातील चांगल्या कामगिरीनंतर बंगाली कलाकार पायल घोष तिच्या प्रेमात पडली. तिने विश्वचषकादरम्यान मोहम्मद शमी याच्याशी लग्न करण्याची जाहीर मागणी केली. सोशल मीडियावर तिने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण नंतर अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर सांगितले की मी फक्त विनोद होता.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.