Rohit Sharma | वर्ल्ड कप फायनलवरुन रोहित-द्रविड यांच्यावर गंभीर आरोप, मोहम्मद कैफला काय उत्तर देणार?
Rohit Sharma | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयामुळे कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांचं भरपूर कौतुक होतय. सीरीज जिंकलो असलो, तरी मागच्या चार महिन्यांपासून भारतीय चाहत्यांच्या मनाला लागलेली ती गोष्ट, ते दु:ख कमी झालेलं नाहीय.
नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाने दमदार कमबॅक केलं. 4-1 ने टेस्ट सीरीज जिंकली. टीम इंडियाचा विजय यासाठी खास आहे, कारण अनेक सीनियर खेळाडू टीमचा भाग नव्हते. युवा खेळाडूंना घेऊन टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध ही मालिका जिंकली. या मालिका विजयाबद्दल कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांचं भरपूर कौतुक होतय. सीरीज जिंकलो असलो, तरी मागच्या चार महिन्यांपासून भारतीय चाहत्यांच्या मनाला लागलेली ती गोष्ट, ते दु:ख कमी झालेलं नाहीय. रोहित आणि द्रविड यांच्यावर आपल्याच माणसाने प्रश्नचिन्ह निर्माण केलय.
वर्ल्ड कप 2023 च्या फायनलच हे दु:ख आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. वर्ल्ड कपचे सलग 10 सामने जिंकल्यानंतर फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झालेला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने सुमार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने मायदेशात वर्ल्ड कप जिंकण्याच टीम इंडियाच स्वप्न मोडलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाख प्रेक्षकांसमोर फायनलचा सामना खेळला गेला. फायनल नंतर पीचचा मुद्दा उपस्थित झाला. टीम इंडियाच्या आदेशावरुन जाणूनबुजून संथ खेळपट्टी बनवण्याच आल्याचा आरोप झाला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांना निष्प्रभावी करण्यासाठी अशा प्रकारचा पीच बनवण्यात आला होता.
त्याने सरळ रोहित-द्रविडच नाव घेतलं
भारतीय टीम मॅनेजमेंटन हा आरोप फेटाळून लावला. पण आता टीम इंडियाला सपोर्ट करणारा माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने हा आरोप केलाय. भारचीय टीमने पीचमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल केले होते, असा आरोप मोहम्मद कैफने केलाय. कैफने अलीकडेच एका मुलाखतीत वर्ल्ड कप फायनलच्या पराभवावर चर्चा केली. पीचबद्दल बोलताना कैफने सरळ रोहित-द्रविडचा नाव घेतलं. रोहित-द्रविडने पीचमध्ये बदल केला, असं कैफ म्हणाला. फायनलच्या तीन दिवस आधी मी मैदानातून शो करत होतो. या दरम्यान रोहित आणि द्रविड येऊन पीच बघायचे.
रोहित-द्रविड कधी मान्य करणार चूक?
मी माझ्या डोळ्यासमोर पीचचा रंग बदलताना पाहिलाय, असा आरोप कैफने केला. कैफने या मागचा अर्थ समजावला. म्हणजे पीचवरुन जबरदस्ती गवत हटवलं. कमी पाणी मारायला लावलं. हे अशासाठी की, वेगवान गोलंदाजांना मदत मिळू नये. आता प्रश्न असा आहे की, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड आपली चूक कधी मान्य करणार की, पीचबद्दलचा त्यांचा प्लान पूर्णपणे चुकीचा होता.