Mohammed Shami | सेमीफायनल जिंकल्यानंतर मोहम्मद शमीने व्यक्त केली एकच खंत
IND vs NZ World Cup 2023 Semi final Match | मोहम्मद शमीने कालच्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. वर्ल्ड कपच्या महत्त्वाच्या स्टेजवर म्हणजे सेमीफायनलमध्ये त्याने ही कामगिरी केली. या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीने स्वप्नवत परफॉर्मन्स दिला. इतक्या जबरदस्त कामगिरीनंतरही मोहम्मद शमीच्या मनात एक खंत आहे.
IND vs NZ World Cup 2023 Semi final Match | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये सेमीफायनलचा सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाने 70 धावांनी विजय मिळवून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. मोहम्मद शमीने या सामन्यात दमदार कामगिरी करुन इतिहास रचला. टुर्नामेंटमध्ये त्याने सर्वोत्तम गोलंदाजीच प्रदर्शन केलं. 9.5 ओव्हर्समध्ये 57 धावा देऊन त्याने 7 विकेट काढल्या. या सर्वोत्तम प्रदर्शनामुळे त्याला सामनवीराचा पुरस्कार मिळाला. या मॅचनंतर प्रेजेंटेशनच्यावेळी शमीने एक खंत व्यक्त केली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसनची कॅच पकडता आली नाही, याची मनात खंत असल्याच शमी म्हणाला.
“वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत तुम्ही तुमच्या देशाच प्रतिनिधी करता ही भावनाच खूप सुंदर आहे. मागच्या दोन वर्ल्ड कपमध्ये मध्यावरच आमचा प्रवास संपलेला आणि हे खूप निराशाजनक होतं. यावेळी वर्ल्ड कप विजयाच्या स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी आहे. माहित नाही, तुम्हाला तुमच्या करीयरमध्ये पुन्हा अशी संधी मिळेल की नाही. त्यामुळे हातात जी संधी आहे, त्याचा फायदा करुन घ्या” असं मोहम्मद शमी सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाला. “माझ्या हातून जी कॅच सुटली, त्या बद्दल मला खराब वाटलं. खरंतर माझ्या हातून ही कॅच सुटायला नको होती” असं शमी म्हणाला.
त्याच्या तीन चेंडूंची कमाल
मोहम्मद शमीच्या हातून कॅच सुटली. पण त्याने त्याची भरपाई गोलंदाजीला आल्यानंतर केली. मोहम्मद शमीने टीमला गरज असताना विकेट मिळवून दिले. त्याने न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन आणि टॉम लॅथमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या तीन चेंडूंनी कमाल केली. वानखेडेवर एकच जोश भरला.
अवघ्या 17 सामन्यात हे यश मिळवलय
मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये 50 विकेट पूर्ण केलेत. आतापर्यंत करीयरमध्ये तो जितके वर्ल्ड कपचे सामने खेळला, त्यात त्याने हा कारनामा केलाय. वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. वर्ल्ड कपमध्ये 50 विकेट घेणाऱ्या सात गोलंदाजांच्या पंक्तीत त्याने स्थान मिळवलय. त्याने वेगवान अवघ्या 17 सामन्यात हे यश मिळवलय. मिचेल स्टार्कने 19 सामन्यात हा टप्पा गाठला होता.