IND vs AUS: 2,2,W,W,W,W पूर्ण मॅच बाहेर बसून होता शमी, शेवटच्या ओव्हरमध्ये केलं तांडव, VIDEO
IND vs AUS: Mohammed Shami ची ती लास्ट ओव्हर किती घातक होती? ते या व्हिडिओमध्ये पहा
मुंबई: ICC T20 World Cup 2022 वॉर्म अप मॅचमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) 6 धावांनी हरवलं. मोहम्मद शमी या मॅचचा हिरो ठरला. संपूर्ण मॅचमध्ये शमीने (Mohammed Shami) फक्त 1 ओव्हर टाकून 4 विकेट घेतल्या. एक रनआऊट झाल्यामुळे त्याच्या खात्यात फक्त 3 विकेट जमा होतील. मोहम्मद शमीची गोलंदाजी पाहून सगळेच जण हैराण झाले.
एका मोठ्या ब्रेकनंतर मोहम्मद शमीने टी 20 टीममध्ये पुनरागमन केलय. एका ओव्हरमध्ये शमीची धोकादायक गोलंदाजी पाहून सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. आशिया कपमध्ये टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत वाटली होती.
रोहित शर्मा काय म्हणाला?
सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला की, “सुधारणेला वाव आहे. मला गोलंदाजांकडून सातत्याने चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ही आमच्यासाठी चांगली मॅच ठरली. त्यांनी चांगली भागीदारी करुन आमच्यावर दबाव आणला. पण शमीने लास्ट ओव्हरमध्ये शानदार प्रदर्शन केलं”
आज शमीच्या फॅन्सचा दिवस
सोशल मीडियावर सातत्याने शमीचे फॅन्स त्याला टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान देण्याची मागणी करत होते. आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली. त्यावेळी शमीच्या समावेशाच्या मागणीने जोर धरला. आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराह नव्हता.
Mohammed Shami bowled a world class 20th over. Just brilliant how accurate he was with his bowling, great signs for India ahead of the group matches.
2,2,W,W,W,W by Shami in the 20th over while defending 11 runs.#INDvsAUS #Shami pic.twitter.com/IoZcOuwOQ2
— Syed Aamir Quadri (@aamir28_) October 17, 2022
शमीने सगळ्यांचीच तोंड बंद केली
काहींनी शमीच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शमी एकवर्षानंतर टी 20 ची मॅच खेळणार आहे. त्याला थेट पाकिस्तान विरुद्ध उतरवण कितपत योग्य ठरेल असा काहींचा प्रश्न होता. पण आजच्या प्रदर्शनाने शमीने सगळ्यांचीच तोंड बंद केली आहेत. शमी जास्त टी 20 सामने खेळलेला नाही. 2014 पासून तो फक्त 17 टी 20 चे सामने खेळलाय. 9.55 च्या इकॉनमी रेटने त्याने 18 विकेट घेतल्या आहेत.