T20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियासाठी एक गुड न्यूज
टीम इंडियाच्या फॅन्सना नक्कीच यामुळे मोठा दिलासा मिळेल.
मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून 3 T20 सामन्यांची सीरीज सुरु झाली आहे. या सीरीजमध्ये टीम इंडियाचे काही विशेष खेळाडू मैदानावर खेळताना दिसणार नाहीत. यात मोहम्मद शमी एक आहे. शमीची ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजसाठी टीममध्ये निवड झाली होती. पण त्याला कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यामुळे शमी या सीरीजमध्ये खेळत नाहीय.
कोरोना रिपोर्ट पोस्ट केला
मोहम्मद शमीने आता तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. निश्चित या अपडेटमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना दिलासा मिळेल. मोहम्मद शमी आता कोरोनामधून बरा झालाय. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेयर केली. त्यात त्याने कोरोना रिपोर्ट पोस्ट केलाय. शमीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.
रिपोर्ट कधी पॉझिटिव्ह आला?
शमीला मागच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. 17 सप्टेंबरला टीमला जॉइन करण्याआधी शमीचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या सीरीजला मुकावं लागलं.
अजूनही तो पूर्णपणे मॅच फिट नाहीय
शमी कोरोनामधून बरा झाला आहे. पण अजूनही तो पूर्णपणे मॅच फिट नाहीय. त्यामुळेच बीसीसीआयने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी विश्रांती दिली. त्याच्याजागी उमेश यादवला टीममध्ये कायम ठेवलं.
टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये मोहम्मद शमीला स्टँडबाय खेळाडू म्हणून स्थान दिलं आहे. त्याची दोन टी 20 सीरीसाठी सुद्धा निवड झाली होती. शमी मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप खेळला. त्यानंतर तो एकही टी 20 सामना खेळलेला नाही.