T20 World Cup: मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियात टीमसाठी हुकूमाचा एक्का ठरला असता, कसं ते 3 पॉइंटमधून समजून घ्या
T20 World Cup: T20 वर्ल्ड कपसाठी सोमवारी टीम इंडियाची घोषणा झाली. 15 खेळाडूंना या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. या टीममधील काही खेळाडूंच्या निवडीवर चाहत्यांना आक्षेप आहे.
मुंबई: T20 वर्ल्ड कपसाठी सोमवारी टीम इंडियाची घोषणा झाली. 15 खेळाडूंना या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. या टीममधील काही खेळाडूंच्या निवडीवर चाहत्यांना आक्षेप आहे. या टीममध्ये मोहम्मद सिराजच नाव नाहीय. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलय. मोहम्मद सिराज सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतोय. तिथे तो आपल्या भन्नाट गोलंदाजीने इंग्लिश काऊंटी टीम्सची वाट लावतोय.
सिराजने किती विकेट घेतल्यात?
त्याची गोलंदाजी खेळणं इंग्लिश फलंदाजांना जमत नाहीय. वारविकशायरकडून खेळताना त्याने सॉमरसेट विरुद्ध पाच विकेट घेतल्या. पाकिस्तान ओपनरला दोन्ही डावात पॅव्हेलियनमध्ये धाडलं.
सिराजने आतापर्यंत 13 टेस्टमध्ये 40 आणि 10 वनेडमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत. त्याने 5 टी 20 सामन्यात 5 विकेट घेतल्यात. सिराजच्या गोलंदाजीच वैशिष्टय जाणून घेऊया.
कोहलीच ब्रह्मास्त्र म्हटलं जायचं
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना मोहम्मद सिराजची कारकिर्द बहरली. सिराजला कोहलीच ब्रह्मास्त्र म्हटलं जायचं. किंग कोहलीने नेहमीच सिराजचा उत्साह वाढवला. कोहलीने नेहमीच कठीण प्रसंगात सिराजच्या हाती चेंडू सोपवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली सिराज 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्यात त्याने 23 विकेट घेतल्या.
- ऑस्ट्रेलियाचं कंबरड मोडलं होतं: यंदाचा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होतोय. ऑस्ट्रेलियात खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळते. इथल्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असतात. ऑस्ट्रेलियाला गाबाच्या मैदानात हरवून टीम इंडियाने इतिहास रचला होता. त्यावेळी सिराज हिरो ठरला होता. दुसऱ्याडावात 5 विकेट काढून त्याने ऑस्ट्रेलियाचं कंबरड मोडलं होतं.
- तर तो हुकूमाचा एक्का ठरला असता: सिराज ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सामना खेळलेला नाही. त्याने तिथे 3 टेस्ट मॅचमध्ये 13 विकेट घेतल्यात. त्यामुळे सिराज टीमसोबत असता, तर तो हुकूमाचा एक्का ठरला असता.
- त्याच्या आक्रमकतेचा फायदा झाला असता: सिराज वेगवान गोलंदाज आहे. मैदानावर तो आक्रमकतेने वावरतो. त्यामुळे एक पॉझिटिविटी येते. टीम इंडियाच्या विजयात सिराजची भूमिका महत्त्वाची असते. सिराज टीम इंडियात असता, तर त्याच्या आक्रमकतेचा टीमला फायदा झाला असता.