IND vs SA | मोठ्या मनाचा Mohammed siraj, प्रामाणिकपणे मान्य केलं की….
IND vs SA Test | पहिल्या कसोटीतील अपयश मागे सोडून Mohammed siraj ने दुसऱ्या कसोटीत दमदार कमबॅक केलं. मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना डोकवर काढण्याची संधी दिली नाही. सिराजने आपल्या घातक बॉलिंग मागच सिक्रेट सांगितलं. यावेळी त्याने एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य केली.
IND vs SA Test | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात खूप कमी धावसंख्येवर रोखलं. केप टाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गरने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी चालली नाही. दक्षिण आफ्रिकेची टीम अवघ्या 55 रन्सवर ऑलआऊट झाली. दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये एका डावातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजमुळे दक्षिण आफ्रिकेची ही हालत झाली. सिराजने 6 विकेट काढून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीच कंबरड मोडलं. दिवसाचा खेळ संपल्यानंतर सिराजने सांगितलं की, त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्वत:ला कसं तयार केलं. कोणाच्या मदतीने तो इतकी घातक गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरला.
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात फक्त 9 ओव्हर टाकल्या. 15 धावा देऊन त्याने सहा विकेट काढले. सिराजने या दरम्यान तीन मेडन ओव्हर टाकल्या. सिराजचा टेस्ट क्रिकेटमधील हा आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह, मुकेश कुमारने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाला खात उघडता आलं नाही.
सिराजनेच सांगितलं यशाच सिक्रेट
दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराजने गोलंदाजी कोच पारस महाम्ब्रे यांच्याशी चर्चा केली. पहिल्या कसोटीतील अपयश मागे सोडून कशी तयारी केली, त्या बद्दल त्याने सांगितलं. पहिल्या कसोटीत जास्त यश मिळालं नाही, त्यावेळी काय चुकलं ते माझ्या लक्षात आलं होतं, असं सिराज म्हणाला. सिराजने त्याच्या बॉलिंगचे व्हिडिओ बघितले नाहीत, पण त्याला कळलेलं काय चुकतय ते. पुढच्या सामन्यात काय करायच ते त्याचवेळी सिराजला कळलं होतं. दुसऱ्या कसोटीत गोलंदाजी करताना प्रयत्न करत होतो, पण यश मिळत नव्हतं. पण चेंडू सोडण्यावर व्यवस्थित लक्ष देत होतो, त्यावेळी चेंडू चांगल्या टप्प्यावर पडत होते. त्यामुळे विकेट मिळाले असं मोहम्मद सिराजने सांगितलं.
From starting the year perfectly with the ball to his bowling partnership with vice-captain Jasprit Bumrah 🤝 😎 @mdsirajofficial recaps Cape Town bowling heroics with #TeamIndia Bowling Coach Paras Mhambrey 👌🏻👌🏻 – By @RajalArora
WATCH the Full Interview 🎥🔽 #SAvIND
— BCCI (@BCCI) January 3, 2024
बुमराहबद्दल मोठ स्टेटमेंट
सिराजने दुसऱ्या कसोटीतील चांगल्या गोलंदाजीच श्रेय जसप्रीत बुमराहला दिलं. सकाळी आल्यानंतर अशा प्रकारे विकेट मिळतील असं वाटलं नव्हतं, असं सिराज म्हणाला. टेस्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजांची पार्टनरशिप सुद्धा महत्त्वाची असते, असं सिराज म्हणाला. बुमराह दुसऱ्याबाजूने ज्या पद्धतीची गोलंदाजी करत होता, त्याची मदतच झाली असं सिराज म्हणाला. “बुमराह आपल्या गोलंदाजीने फलंदाजांवर दबाव टाकत होता. याचा फायदा झाला, मला विकेट मिळाले” असं सिराज म्हणाला.