T20 World Cup टीममधून डावललं, आता भारताच्या ‘या’ गोलंदाजाने इंग्लंडमध्ये काढला ‘राग’
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या इंग्लंडमध्ये आहे. वॉर्विकशरकडून तो काऊंटी क्रिकेट खेळतोय. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये वॉर्विकशरचा सामना सॉमरसेट विरुद्ध सुरु आहे.
मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या इंग्लंडमध्ये आहे. वॉर्विकशरकडून तो काऊंटी क्रिकेट खेळतोय. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये वॉर्विकशरचा सामना सॉमरसेट विरुद्ध सुरु आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजीचा नमुना दाखवला. त्याने सॉमरसेटचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला.
सिराजची महत्त्वाची भूमिका
सॉमरसेटच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये फक्त 219 धावा केल्या. सॉमरसेटला कमी धावसंख्येवर रोखण्याता सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली.
किती मेडन ओव्हर?
सिराजने या मॅचमध्ये पहिल्या डावात पाच विकेट काढल्या. सिराजने 24 षटक गोलंदाजी केली. त्याने सहा मेडन ओव्हर टाकल्या. त्याने एकूण 82 धावा दिल्या. सिराजने सॉमरसेटच्या मधल्या आणि लोअर ऑर्डरला चांगलच सतावलं. काल टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर झाली. पण यात मोहम्मद सिराजच नाव कुठेही नव्हतं.
इमाम उल हकचा पहिला विकेट
इमाम उल हकला आऊट करुन सिराजने आपला पहिला विकेट घेतला. 12 रन्सवर सिराजने इमामला बाद केलं. सॉमरसेटला तो पहिला झटका होता. त्यानंतर त्याने जॉर्ज बार्टलेटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. सिराजने जेम्स रियूला खातही उघडू दिलं नाही.
भेदक मारा
लुइस ग्रेगोरी चांगल्या फॉर्ममध्ये होता. चांगली बॅटिंग करत होता. त्याने अर्धशतक झळकावलं. सिराजने त्याला 60 धावांवर रोखलं. जॉश डेवी डावाच्या अखेरीस सॉमरसेटला सावरण्याचा प्रयत्न करत होता. पण सिराजने त्यालाही 21 धावांवर तंबूत पाठवलं.
साजिद खानने डाव संभाळला
सिराज एकाबाजूने भेदक मारा करत होता. त्यावेळी सॉमरसेटची धावसंख्या 200 पार होण्याची शक्यता कमी होती. पण साजिद खान 53 धावांवर नाबाद राहिला. त्याने टीमची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. त्याने 63 चेंडूचा सामना करताना नऊ चौकार लगावले. सिराजशिवाय वॉर्विकशरसाठी हेनरी ब्रूक्सने तीन विकेट घेतल्या. भारतीय ऑफ स्पिनर जयंत यादव आणि ऑलिवर हेननने प्रत्येकी एक विकेट घेतला.