Mohammad Siraj : मोहम्मद सिराज ट्रोल! काहींनी घेतली बाजू, काहींनी केलं ट्रोल,आरसीबीच्या डायरेक्टरचंही मोठ वक्तव्य
सोशल मीडियावर काहींना सिराजवर टीका केली आहे. तर काहींनी त्याच्या बाजूनं मत मांडलंय.
मुंबई : एखादा सामना हरला की लगेच सोशल मीडियावर (Social media) खेळाडुंला टार्गेट केलं जातं. ते ट्रोलही होतात. असेच प्रकार मागच्या काही काळात घडले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) चाहत्यांच्या निशाण्यावर आलाय. सोशल मीडियावर मोहम्मद सिराजला खूप ट्रोल केलं जात होतं. तर काही चाहत्यांनी सिराजची बाजूही घेतली. अनेकांनी त्याची बाजू सोशल मीडियावर मांडली आहे. कुणी फेसबुक पोस्ट केली आहे तर कुणी ट्विट केलंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचागोलंदाज मोहम्मद सिराज राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या क्वालिफायर-2 मध्ये चांगलाच महागात पडला. या षटकात सिराजने फक्त 2 षटके टाकली. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी सिराजच्या 2 षटकात 31 धावा केल्या. दरम्यान, क्रिकेटचे संचालक, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) माईक हेसन यांनी मोहम्मद सिराजला मोठं वक्तव्य केलंय.
चाहते काय म्हणतायेत?
Siraj had a horrible season, there’s no denying it. Much like Virat, he was a liability throughout. But guess what? His performance gives you NO RIGHT to abuse him. You’ve got to be one sick individual to sink so low as to even drag his late father.
हे सुद्धा वाचा— Ishika (@IshikaMullick) May 28, 2022
Siraj don’t deserve this type of hate ??
We always with you @mdsirajofficial Come back strong ?? pic.twitter.com/UNzePOrJbR
— Shamsi (MSH) (@Shamsihaidri1) May 27, 2022
‘आत्मविश्वास कमी’
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी सांगितलं की, ‘या सामन्यानंतर मोहम्मद सिराजचा आत्मविश्वास नक्कीच कमी झालाय. तो लवकरच जोरदार पुनरागमन करेल. मोहम्मद सिराज चांगला गोलंदाज आहे. पण हा मोसम त्याच्यासाठी चांगला राहिला नाही. मात्र, आगामी काळात तो जोरदार पुनरागमन करेल. या मोसमात तो नवीन चेंडूवर सिराजचा स्विंग करण्यात तसेच विकेट घेण्यात अपयशी ठरला,’ असंही हेसन म्हणालेत.
सोशल मीडियावर काय बोललं जातंय?
Trolling Siraj is understandable, but bringing his late father’s profession to disregard him is just a worst behaviour!?
Practice more, Correct ur mistakes and Comeback More Stronger Miyaan!❤️ pic.twitter.com/kCNWa9Y8Mj
— ??????? | (?????????) (@Aaliya_Zain5) May 28, 2022
Toxic RCB fans!
Siraj’s Instagram handle is a sorry sight to see. Fans have even made fun of his father’s death, his religion and poverty. Trolled Daniel Christian last year mercilessly and now Siraj. PATHETIC…
— Vinesh Prabhu (@vlp1994) May 28, 2022
सोशल मीडियावर काहींना सिराजवर टीका केली आहे. तर काहींनी त्याच्या बाजूनं मत मांडलंय. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी देखील थोडी नाराजी दाखवत पुन्हा तो चांगलं पुनरागमन करणार असल्याचं म्हटलंय.