Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचा माहीसमोर धुमाकूळ, MS Dhoni समोर मोडला त्याचा T20I मधील रेकॉर्ड
Suryakumar Yadav : सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनी सुद्धा उपस्थित होता. सूर्यासाठी हा क्षण खूप खास होता. कारण सूर्याने माहीसमोर टी 20 इंटर नॅशनलमधील त्याचा हा रेकॉर्ड मोडला
Suryakumar Yadav MS Dhoni T20I : रांचीमध्ये काल पहिला T20 सामना झाला. या मॅचमध्ये भले टीम इंडियाचा पराभव झाला. पण टी 20 च्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने धोनीला मागे टाकलं. टी 20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्यांच्या यादीत सूर्याने एमएस धोनीला मागे टाकलय. सूर्याचे आता टी 20 इंटरनॅशनलमध्ये एकूण 1625 रन्स आहेत. धोनीने आपल्या T20 इंटरनॅशनल करिअरमध्ये 98 मॅचेसमध्ये 1617 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत T20 इंटरनॅशनल करिअरमध्ये 46 सामन्यात 1625 धावा केल्या आहेत.
सूर्याच्या पुढे कोण आहे?
सूर्यकुमार यादव भारताकडून T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. टी 20 मध्ये सूर्याच्या पुढे विराट कोहली (4008), रोहित शर्मा (3853), केएल राहुल (2265) आणि शिखर धवन (1759) हे प्लेयर्स आहेत.
धोनीलाच नाही, ‘या’ प्लेयरला सुद्धा टाकलं मागे
T20 क्रिकेटमध्ये सूर्याने फक्त एमएस धोनीच नाही, टीम इंडियाचा दुसरा स्फोटक फलंदाज सुरेश रैनाला मागे टाकलं. रैनाने 78 सामन्यात 66 इनिंगमध्ये 1605 धावा केल्या आहेत. या सोबतच सूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.
MSD + Ranchi = ?
When the Ranchi crowd welcomed the legendary @msdhoni in style ??#TeamIndia | #INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/40FoEDudSv
— BCCI (@BCCI) January 27, 2023
न्यूझीलंड विरुद्ध किती धावा केल्या? न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव झाला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 34 चेंडूत 47 धावा फटकावल्या. यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. धोनीसमोर तोडला त्याचा रेकॉर्ड
भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना रांचीमध्ये खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनी सुद्धा उपस्थित होता. सूर्यासाठी हा क्षण खूप खास होता. कारण सूर्याने माहीसमोर टी 20 इंटर नॅशनलमधील त्याचा हा रेकॉर्ड मोडला.