MPL 2023 ENT vs CSK | धोनीचा सहकारी फेल, नाशिक टायटन्सचा छत्रपती संभाजी किंग्सवर निसटता विजय

MPL 2023 ENT vs CSK : नाशिकडून खेळणाऱ्या अर्शिन कुलकर्णीने धावांचा पाऊस पाडला. टीम इंडियातून खेळणारा स्टार क्रिकेटर आणि एमएस धोनीच्या सीएसके टीममधील खेळाडू दोघेही फ्लॉप ठरले. उलट स्थानिक खेळाडूंनी चमक दाखवली.

MPL 2023 ENT vs CSK | धोनीचा सहकारी फेल, नाशिक टायटन्सचा छत्रपती संभाजी किंग्सवर निसटता विजय
MPL 2023 ENT vs CSKImage Credit source: Fancode
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 9:45 AM

पुणे : IPL 2023 नंतर आता महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सीजन सुरु झाला आहे. MPL 2023 चा हा पहिला सीजन आहे. गुरुवारी सलामीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्या पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सवर 8 विकेट्स विजय मिळवला. शुक्रवारी इगल नाशिक टायटन्स आणि छत्रपती संभाजी किंग्समध्ये दुसरा सामना झाला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर हे सामने सुरु आहेत. पहिल्या सीजनमध्ये एकूण सहा टीम्स असून लीग स्टेजमध्ये एकूण 19 सामने होणार आहेत.

इगल नाशिक टायटन्सला जोरदार सलामी

हे सुद्धा वाचा

इगल नाशिक टायटन्स आणि छत्रपती संभाजी किंग्समध्ये शुक्रवारी दिवसातला पहिला सामना खेळला गेला. इगल नाशिक टायटन्सने पहिली बॅटिंग केली. हर्षद खाडीवले आणि अर्शिन कुलकर्णी या ओपनिग जोडीने इगल नाशिक टायटन्सला जोरदार सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 99 धावा जोडल्या.

छत्रपती संभाजी किंग्सला दिलं डोंगराएवढ लक्ष्य़

अर्शिनने छत्रपती संभाजी किंग्सच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्याने 34 चेंडूत 60 धावा चोपल्या. यात 3 फोर, 5 सिक्स होते. हर्षदने 34 चेंडूत 43 धावा केल्या. त्याने 3 फोर, 2 सिक्स मारले. डावाच्या अखेरीस धनराज शिंदेने 17 चेंडूत नाबाद 35 धावा तडकावल्या. यात 1 फोर, 3 सिक्स होते. या तिघांच्या फलंदाजीच्या बळावर नाशिक टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 195 धावा केल्या.

धोनीचा सहकारी फेल

नाशिककडून खेळणारा टीम इंडियाचा खेळाडू राहुल त्रिपाठी चमक दाखवू शकला नाही. तो अवघ्या 11 रन्सवर बाद झाला. छत्रपती संभाजी किंग्सकडून शामशुझमा काजी आणि रामेश्वर दौडने प्रत्येकी 2 विकेट घेतले. धोनीच्या CSK कडून खेळणारा राज्यवर्धन हंगरगेकर अपयशी ठरला. त्याने 3 ओव्हर्समध्ये 38 धावा दिल्या. पण एकही विकेट काढता आला नाही.

छत्रपती संभाजी किंग्सवर नाशिकचा निसटता विजय

इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना छत्रपती संभाजी किंग्सकडून कोणी एकाने मोठी खेळणे करणे अपेक्षित होते. पण विकेटकीपर सौरभ नवाळेचा अपवाद वगळता अन्य फलंदाज तशी कामगिरी करु शकले नाहीत. सौरभने 24 चेंडूत 46 धावा केल्या. त्याने 7 चौकार मारले. मुर्तझा ट्रंकवालाने 21 चेंडूत 35 धावा केल्या. धोनीच्या CSK कडून खेळणाऱ्या राज्यवर्धन हंगरगेकरने 8 चेंडूत 21 धावा केल्या. अखेर पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्याचा VJD मेथडने निकाल लागला. इगल नाशिक टायटन्स टीमने छत्रपती संभाजी किंग्सवर निसटत्या 4 धावाच्या फरकाने विजय मिळवला.

बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.