MPL 2023 ENT vs PB | नाशिकच्या मुलाची कमाल 3 फोर, 13 SIX, Ruturaj Gaikwad च्या पुणेरी बाप्पाला झटका, VIDEO
Maharashtra premier league | महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सोमवारी ईगल नाशिक टायटन्स आणि पुणेरी बाप्पा या दोन टीम्स आमने-सामने होत्या. या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडला. महाराष्ष्ट्राच्या एका युवा क्रिकेटरने धमाकेदार शतक झळकावलं.
पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत राज्यातील युवा क्रिकेटर्स जबरदस्त प्रदर्शन करतायत. IPL च्या धर्तीवर MPL 2023 स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेटच्या T20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. पुण्याच्या गहुजे स्टेडियमवर सामने सुरु आहेत. एकूण सहा टीम्स या स्पर्धेमध्ये आहेत. काल ईगल नाशिक टायटन्स आणि पुणेरी बाप्पा टीममध्ये सामना झाला. महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सोमवारी दुसर शतक पहायला मिळालं. नाशिक टायटन्सच्या अर्शिन कुलकर्णीने धमाकेदार शतकी खेळी केली.
अर्शिन कुलकर्णीने 54 चेंडूत 117 धावा फटकावल्या. यात त्याने 3 फोर, 13 सिक्स मारले. पहिला विकेट लवकर गेला. पण दुसऱ्या विकेटसाठी अर्शिन कुलकर्णीने राहुल त्रिपाठीसोबत 131 धावांची भागीदारी केली. राहुल त्रिपाठी टीम इंडियाकडून खेळतो. त्रिपाठीने 28 चेंडूत 41 धावा केल्या. यात 2 फोर, 2 सिक्स आहेत.
नाशिककडून धावांचा डोंगर
अर्शिन आणि राहुल दोघांव्यतिरिक्त नाशिकचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. अर्शिनने चौफेर फटकेबाजी केली. पुण्याच्या गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेतला. अर्शिनला रोखण कठीण दिसत होतं. अखेर एसए कोठारीने त्याचा अडथळा दूर केला. पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता. अर्शिनने आपलं काम चोख बजावलं होतं. नाशिकने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 203 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडची स्फोटक बॅटिंग
औरंगाबाद पैठणच्या अंकित बावनेनंतर महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये शतक झळकवणारा अर्शिन दुसरा फलंदाज आहे. समोर मोठं लक्ष्य असूनही ऋतुराज गायकवाडच्या पुणेरी बाप्पाने जोरदार झुंज दिली. ओपनर पवन शाहने 16 चेंडूत 30, यश क्षिरसागरने 27 चेंडूत 47 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने स्फोटक बॅटिंग केली. त्याने 23 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. यात 3 फोर, 3 सिक्स होते. समाधान पगारेने ऋतुराजला बोल्ड केलं.
What a Night for 18 year old Arshin Kulkarni in Maharashtra Premier league
Scored 117 off 54 (3x4s, 13x6s) while opening the bat and then 4-22 including defending 6 runs in the final over.#MPL #ENT #PB #rahultripathi @RRPSpeaks @Ruutu1331 pic.twitter.com/TmMcfY28Ih
— Akshay Khade (@Akkikhade3637) June 19, 2023
पुणेरी बाप्पाचा अवघ्या 1 रन्सने पराभव झाला. 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणेरी बाप्पाने 8 बाद 202 धावा केल्या.