Ms Dhoni, सुनील गावस्कर विम्बल्डनच्या कोर्टवर, सानिया मिर्झा सेमीफायनल मध्ये पराभूत
महेंद्रसिहं धोनीने (MS Dhoni) आज वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण केलं. पण त्याआधी धोनी विम्बल्डनचा (Wimbledon) सामना पहाण्यासाठी आला होता.
मुंबई: महेंद्रसिहं धोनीने (MS Dhoni) आज वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण केलं. पण त्याआधी धोनी विम्बल्डनचा (Wimbledon) सामना पहाण्यासाठी आला होता. विम्बल्डन कोर्टवर धोनी टेनिस सामन्याचा आनंद घेताना दिसला, ज्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. विम्बल्डनच्या कोर्टवर एकटा धोनी नव्हता, तर त्याच्यासोबत महान फलंदाज सुनील गावस्करही (Sunil Gavaskar) होते. हे दोन्ही लीजेंड क्रिकेटपटू वेगवेगळ्या कारणांसाठी इंग्लंडमध्ये आहेत. पण विम्बल्डन कोर्टवर ते एकाच कारणासाठी उपस्थित होते. सानिया मिर्झाचा मिश्र दुहेरीचा सामना पहाण्यासाठी ते विम्बल्डन कोर्टवर हजर असल्याची चर्चा आहे. या सामन्यात सानिया मिर्झाचा पराभव झाला. धोनी सध्या इंग्लंडमध्ये फिरण्यासाठी म्हणून गेला आहे. 7 जुलै आज त्याचा 41 वा वाढिदवस आहे. लग्नाचा 12 वा वाढदिवसही त्याने तिथेच साजरा केला. सुनील गावस्कर इंग्लंडमध्ये क्रिकेट कॉमेंट्री करण्यासाठी म्हणून गेले आहेत. मोकळ्यावेळात भारतीय क्रिकेटमधील हे दोन्ही दिग्गज टेनिसचा आनंद घेण्यासाठी म्हणून विम्बल्डन कोर्टवर पोहोचले.
धोनी सोबत अजून कोण होतं?
विम्बल्डनने एमएस धोनी सामना पहात असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये धोनी मित्र आणि जवळच्या व्यक्तींसोबत सामन्याचा आनंद लुटताना दिसतोय. धोनीचा आयपीएल संघ सीएसकेने सुद्धा हा फोटो शेयर केलाय.
An Indian icon watching on ??#Wimbledon | @msdhoni pic.twitter.com/oZ0cNQtpXY
— Wimbledon (@Wimbledon) July 6, 2022
सानिया मिर्झाचा पराभव
एमएस धोनी आणि सुनील गावस्कर विम्बल्डन कोर्टवर पोहोचले, पण कोणाचा सामना पहाण्यासाठी त्या बद्दल स्पष्टता नाहीय. सानिया मिर्झाचा मिश्र दुहेरीचा सामना पहाण्यासाठी ते आले होते, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. सानिया मिर्झा पहिल्यांदाच विम्बल्डनमध्ये मिश्र दुहेरीच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली होती. सानिया मिर्झा-मेट पॅव्हीक जोडीचा Krawczyk-Skupski जोडीने 6-4, 5-7,4-6 असा पराभव केला. सानिया मिर्झाने पहिला सेट जिंकला होता.