MS Dhoni Birthday: 41 व्या बर्थ डे ला धोनीने गाठली 41 फुटाची उंची, जिथं-तिथं याचं फोटोची चर्चा
MS Dhoni Birthday: MS Dhoni आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Cricket) भले निवृत्त झाला असेल, पण क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची लोकप्रियता आजही टिकून आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना, त्याच्याबद्दल जी क्रेझ होती, तीच आजही कायम आहे.
मुंबई: MS Dhoni आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Cricket) भले निवृत्त झाला असेल, पण क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याची लोकप्रियता आजही टिकून आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना, त्याच्याबद्दल जी क्रेझ होती, तीच आजही कायम आहे. भारतात धोनीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. याचच आणखी एक उदहारण समोर आहे. एका चाहत्याने धोनीचं 41 फुटाचं कटआउट उभारलय. तुम्हाला प्रश्न पडेल, धोनीचं 41 फुटाचंच कटआउट का?, तर धोनी यंदाच्या वाढदिवसाला वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. धोनी गुरुवारी 7 जुलैला आपला 41 वाढदिवस साजरा करेल. धोनी पत्नी साक्षीसोबत सध्या इंग्लंडमध्ये (England) आहे. 4 जुलैला लग्नाचा वाढदिवस त्याने तिथेच साजरा केला. आता तो त्याचा 41 वाढदिवसही तिथेच साजरा करेल, अशी शक्यता आहे. धोनीने त्याचा 41 वा वाढदिवस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात साजरा करु दे. पण त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे चाहते, खास त्यांच्या स्टाइलने धोनीचा वाढदिवस सेलिब्रेट करतात.
कुठे राहतो हा चाहता?
आंध्र प्रदेशच्या विजयवाडा जिल्ह्यात रहाणाऱ्या त्याच्या चहात्याने हा 41 फुटचा कटआउट उभारलाय. हॅलिकॉप्टर शॉट धोनीची ओळख आहे. या कटआउटमध्ये धोनीची तीच मुद्रा दिसतेय. सोशल मीडियावर धोनीचा हा कटआउट चर्चेत असून चाहते त्यावर आपआपली Reaction देत आहेत.
धोनी इतका लोकप्रिय का?
धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये जे योगदान दिलय, त्यामुळे तो क्रिकेट चाहत्यांमध्ये इतका लोकप्रिय आहे. वर्ल्ड क्रिकेट मध्ये धोनीने भारताचं स्थान आणखी उंचावलं. धोनीच्या नेतृत्वाखाली भारत कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 झाला. ICC च्या तिन्ही मोठ्या स्पर्धा जिंकल्या.
41 feet cutout of MS Dhoni for his 41st birthday in Vijaywada District. pic.twitter.com/bj9JFa4EeL
— Johns. (@CricCrazyJohns) July 5, 2022
आजारपणाची चर्चा
धोनी सध्या त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. मागच्या एक महिन्यापासून धोनी या आजाराने त्रस्त आहे. धोनीचा हा आजार गुडघे दुखापतीशी संबंधित आहे. धोनी स्वत: कोट्यधीश आहे. खरंतर तो एखाद्या मोठ्या डॉक्टरकडून, रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकतो. पण धोनी एका साध्या वैद्याकडून त्याच्या आजारावर उपचार घेतोय.