Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni Bollywood Debut : धोनी बॉलिवूड चित्रपटात अभिनय करणार? कॅप्टन कूल म्हणतो…

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तथापि, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) चेन्नई सुपरकिंग्जकडून (Chennai Superkings) खेळत आहे.

MS Dhoni Bollywood Debut : धोनी बॉलिवूड चित्रपटात अभिनय करणार? कॅप्टन कूल म्हणतो...
MS Dhoni
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 12:24 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तथापि, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) चेन्नई सुपरकिंग्जकडून (Chennai Superkings) खेळत आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, धोनी जाहिरातींमध्येही दिसतो. नुकत्याच रिलीज झालेल्या आयपीएल 2021 च्या जाहिरातीत धोनीचा हटके अंदाज पाहायला मिळाला. धोनीच्या अनेक चाहत्यांनी त्याला बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचा सल्लाही दिला आहे, पण आपल्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल त्याने काय विचार केलाय याचा खुलासा नुकताच धोनीने केला आहे. (MS Dhoni Bollywood Debut : Will Dhoni step into Bollywood? Cricketer gave a funny answer)

धोनीचा बायोपिक बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याची भूमिका साकारली होती. धोनीने त्याच्या बायोपिकमध्ये स्वतःचे पात्र साकारावे, अशी मागणी त्या वेळी अनेक लोक करत होते, पण एक क्रिकेटपटू दीर्घकाळ कॅमेऱ्यासमोर राहू शकत नाही, असे धोनीला वाटते. इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, धोनी म्हणतो की, तो निवृत्तीनंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्याचा विचारही करत नाही, कारण त्याला वाटते की, अभिनय करणे सोपे नाही.

धोनी नेमकं काय म्हणाला?

रिपोर्टनुसार, धोनी म्हणाला, तुम्हाला माहित आहे बॉलिवूड खरोखर माझ्यासाठी नाही. तुम्ही जाहिरातींबद्दल बोलत असाल तर त्यात मी जे काही करतोय, करु शकतो, त्यातच मी आनंदी आहे. जेव्हा चित्रपटांचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटते की हा एक अतिशय कठीण व्यवसाय आहे आणि ते करणे खूप कठीण आहे. मी ते फिल्मी स्टार्सवर सोपवतो, कारण ते खरोखरच चांगले आहेत. मी क्रिकेटशी जोडलेला असेन. मी फक्त जाहिरातींद्वारे अभिनयच्या जवळ येऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही.

बॉलिवूड चित्रपटात कॅमिओ

खूप कमी लोकांना माहित आहे की धोनीने एका बॉलिवूड चित्रपटात कॅमिओ केला होता, पण त्याचा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. ‘हुक या क्रूक’ असे या चित्रपटाचे नाव होते, हा चित्रपट डेव्हिड धवन दिग्दर्शित करत होते. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि श्रेयस तळपदे सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे शूटिंग 2010 मध्ये सुरू झाले. या चित्रपटाची कथा एका अशा मुलाची होती ज्याचे स्वप्न आहे भारतीय क्रिकेट संघात सामील होण्याचे, पण दुर्दैवाने त्याचा प्रवास तुरुंगातच संपतो. या चित्रपटात धोनीने एक कॅमिओ केला होता, परंतु काही कारणामुळे शूटिंग नंतर पूर्ण होऊ शकले नाही आणि या चित्रपटाचं कायमचं पॅकअप करण्यात आलं.

नुकतेच हरभजन सिंग आणि इरफान पठाण सारख्या क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर चित्रपटात पदार्पण केले आहे. हरभजन सिंगचा चित्रपट फ्रेंडशिप गेल्या महिन्यात रिलीज झाला. त्याचबरोबर इरफान पठाण कोब्रा या चित्रपटात दिसला होता. या दोन खेळाडूंच्या आधी विनोद कांबळी, अजय जडेजा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली देखील चित्रपटांमध्ये दिसले आहेत. अशा परिस्थितीत धोनीचे चाहतेही त्याला सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

इतर बातम्या

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

(MS Dhoni Bollywood Debut : Will Dhoni step into Bollywood? Cricketer gave a funny answer)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.