Team India Coach : धोनीच्या शब्दाला तो मान देईल का? पुढचा कोच निवडण्यात धोनीची भूमिका महत्त्वाची

Team India Coach : टीम इंडियाचा पुढचा हेड कोच निवडण्यात महान क्रिकेटपटू एमएस धोनींची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप नंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआयचा आतापासूनच टीम इंडियाच्या पुढच्या हेड कोचचा शोध सुरु आहे.

Team India Coach : धोनीच्या शब्दाला तो मान देईल का? पुढचा कोच निवडण्यात धोनीची भूमिका महत्त्वाची
MS Dhoni
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 11:18 AM

पुढच्या महिन्यात T20 वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. बीसीसीआयने आतापासूनच टीम इंडियाच्या हेड कोचचा शोध सुरु आहे. प्रशिक्षकपदाचा हा शोध आता इंटरेस्टिंग वळणावर आला आहे. हेड कोचचा इतका मोठा निर्णय घेताना, बीसीसीआयवर एमएस धोनीची मदत घेण्याची वेळ येऊ शकते. एमएस धोनी टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला. धोनीने आतापर्यंत टीम इंडियाला गरज असताना मदत केलीय. आता पुन्हा एकदा बीसीसीआयला धोनीच्या मदतीची गरज लागू शकते. कारण बीसीसीआय टीम इंडियाचा पुढचा हेड कोच म्हणून स्टीफन फ्लेमिंगचा विचार करत आहे. स्टीफन फ्लेमिंग आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायजीचा यशस्वी कोच आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाखाली CSK ने आतापर्यंत पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

स्टीफन फ्लेमिंग न्यूझीलंडचा माजी कर्णधार आहे. बीसीसीआयसोबत दीर्घकाळ कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी स्टीफन फ्लेमिंगची काकुं सुरु आहे. स्टीफन फ्लेमिंगला आयपीएलमध्ये सर्वाधिक काळ कोचिंगचा अनुभव आहे. उत्क्रृष्ट रणनिती आखण्यासाठी आणि खेळाडूंना व्यवस्थित हाताळण्यासाठी स्टीफन फ्लेमिंग ओळखला जातो. सध्या स्टीफन फ्लेमिंगकडे टेक्सास सुपर किंग्स (अमेरिका), जोबर्ग सुपर किंग्स (दक्षिण आफ्रिका) आणि साऊर्थन ब्रेव्ह (इंग्लंड) या टीमच्या कोचिंगची जबाबदारी आहे.

का उत्सुक नाही?

लीगमध्ये छोटा सीजनमध्ये असल्याने स्टीफन फ्लेमिंगला कुटुंबासोबत बराच वेळ व्यतीत करता येतो. टीम इंडियाच्या हेड कोचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याला कुटुंबाला इतकावेळ देता येणार नाही. कारण कॉन्ट्रॅक्ट काही वर्षांसाठी असेल, त्यात सतत दौरे एकदम व्यस्त वेळापत्रक असेल. त्यामुळे स्टीफन फ्लेमिंग इतका उत्साह दाखवत नाहीय. फक्त फ्लेमिंगच नाही, इतर फॉरेन कोचेस सुद्धा तितके उत्साही नाहीत. याच कारण म्हणजे दीर्घकाळाच कॉन्ट्रॅक्ट. त्यातुलनेत आयपीएलच्या एका सीजनमधून त्यांना बक्कळ पैसा कमावता येतो.

एमएस धोनीचा प्रभाव महत्त्वाचा

स्टीफन फ्लेमिंगने अजून ऑफर नाकारलेली नाही. पण तितकी तळमळ सुद्धा दाखवलेली नाही. एमएस धोनी आणि स्टीफन फ्लेमिंगमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून उत्तम मैत्रीच नातं आहे. सीएसकेमध्ये दोघे अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. त्यामुळे स्टीफन फ्लेमिंगला तयार करण्यात एमएस धोनीचा प्रभाव महत्त्वाचा ठरु शकतो.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.