CSK IPL 2023 Final : MS Dhoni फायनलमध्ये खेळणार नाही का? त्याच्यावर बंदी येणार का? मैदानात त्याने असं काय केलं?

CSK IPL 2023 Final : गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात धोनीकडून मोठी चूक. धोनीवर काय आरोप आहे? अंपायर्सच्या निर्णयाकडे सगळ लक्ष. सीएसकेची टीम आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये पोहोचली आहे.

CSK IPL 2023 Final : MS Dhoni फायनलमध्ये खेळणार नाही का? त्याच्यावर बंदी येणार का? मैदानात त्याने असं काय केलं?
CSK MS dhoni IPL 2023
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 9:59 AM

चेन्नई : चेपॉक स्टेडियमवर काल चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये क्वालिफायर-1 चा सामना झाला. या मॅचमध्ये CSK ने बाजी मारली. त्यांनी 15 धावांनी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. चेन्नईने मिळवलेल्या विजयाच कौतुक कराव तेवढं कमी आहे, कारण गुजरात सारख्या बलाढ्य टीम विरुद्ध त्यांनी हा विजय मिळवला. सीएसकेने मिळवलेल्या या विजयाच श्रेय कॅप्टन एमएस धोनीला जातं.

त्याच्या अचूक रणनितीमुळे चेन्नईने विजय मिळवून IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. चेन्नईने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 7 विकेटवर 172 धावा केल्या. गुजरात टायटन्सला चेन्नईने 157 धावांवर रोखलं.

धोनीकडून काय चूक झाली?

याच मॅच दरम्यान धोनीकडून एक चूक झाल्याची चर्चा आहे. ज्यामुळे धोनीवर बंदीची कारवाई झाल्यास, त्याला फायनल मॅचमध्ये खेळता येणार नाही. क्वालिफायर 1 च्या सामन्यात धोनीने जाणूनबुजून वेळ वाया घालवल्याच आरोप होत आहे. एकदा ओव्हर्सची गती धीमी राखून अचारसंहितेच उल्लंघन केल्या प्रकरणी त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली होती.

किती मिनिटं उशिर झाला?

28 मे रोजी गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलची फायनल होणार आहे. गुजरातची टीम बॅटिंग करताना शेवटच्या काही ओव्हर्समध्ये धोनीने मैदानावरील अंपायर्ससोबत वाद घातला. त्यामुळे सामन्याला चार मिनिटं उशिर झाला.

अंपायर्सच काय म्हणणं होतं?

गुजरातची बॅटिंग सुरु असताना, 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. माथीशा पाथीराणााला दुसरी ओव्हर टाकण्यापासून मनाई करण्यात आली. श्रीलंकेच्या या वेगवान गोलंदाजाने नऊ मिनिटांचा ब्रेक घेतला होता. तो मैदानाच्या बाहेर गेला होता. जेव्हा तो गोलंदाजीसाठी आला, तेव्हा अंपायर्सनी त्याला रोखलं व धोनीसोबत चर्चा केली. पाथिराणाने ब्रेकनंतरचा मैदानावरील वेळ पूर्ण केलेला नाही, असं अंपायर्सच म्हणण होतं.

क्रिकेटचा नियम काय सांगतो?

नियमानुसार, गोलंदाज जितकावेळ ब्रेकवर असतो. तितकाच वेळ त्याने मैदानात घालवल्यानंतर त्याला गोलंदाजी करता येते.

कॉमेंटेटर्स काय म्हणाले?

“धोनीने पाच मिनिट अंपायर्ससोबत वाद घातला. अंपायर्ससोबत 5 मिनिट वाद घातला. हे अनावश्यक आहे. यामुळे खेळ थांबलाय. त्याऐवजी दुसऱ्या बॉलरला गोलंदाजी द्या. मॅच संपल्यानंतर धोनीने या बद्दल खेद व्यक्त करावा” असं सायमन डुल ऑनएअर म्हणाले. अंपायर्स काय निर्णय घेणार?

अनावश्यक वेळ वाया गेला, त्या बद्दल अंपायर्स धोनीवर कारवाई करणार का? त्या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. अधिकाऱ्यांनी धोनीला दोषी ठरवलं, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा बंदीची शिक्षा ठोठावली जाईल.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.