CSK IPL 2023 Winner : विजयानंतर CSK ने IPL ट्रॉफी विशेष पूजेसाठी नेली ‘या’ मंदिरात
CSK IPL 2023 Winner : विजेतेपद मिळवल्यानंतर CSK ने ट्रॉफी पूजेसाठी कुठल्या मंदिरात नेली?. आयपीएल ट्रॉफी अहमदाबादून पासून 1700 किमी अंतरावर एका मंदिरात दिसली. चेन्नई टीमच सकाळी 6 वाजेपर्यत हॉटेलमध्ये विजयाच सेलिब्रेशन सुरु होतं.
चेन्नई : एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्स 5 व्यां दा आयपीएल चॅम्पियन बनली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये CSK ने गुजरात टायटन्सवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नईच्या टीमकडून मंगळवार सकाळपर्यंत विजयाच सेलिब्रेशन सुरु होतं. त्यानंतर काही तासांनी चेन्नईने जिंकलेली आयपीएल ट्रॉफी अहमदाबादून पासून 1700 किमी अंतरावर एका मंदिरात दिसली.
या मंदिरात आयपीएल ट्रॉफीची विशेष पूजा करण्यात आली. पावसामुळे फायनल सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवण्यात आला. रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा खराब हवामानामुळे सामना उशिरापर्यंत चालला. 29 मे रोजी सामना संपायला पाहिजे होता. पण रात्री 1.30 वाजता मॅच संपली. म्हणजे काल 30 तारखेला मॅच संपली.
कुठे नेली आयपीएल ट्रॉफी ?
चेन्नई टीमच सकाळी 6 वाजेपर्यत हॉटेलमध्ये विजयाच सेलिब्रेशन सुरु होतं. त्यानंतर संपूर्ण टीम चेन्नईला रवाना झाला. CSK इथे विजयी मिरवणूक काढून फॅन्सचे आभार मानणार आहे. याआधी अहमदाबादहून आयपीएल ट्रॉफी थेट चेन्नईच्या तिरुमाला तिरुपती मंदिरात नेण्यात आली. तिथे आयपीएल ट्रॉफीची विशेष पूजा करण्यात आली.
CSK performed a special Pooja for IPL Trophy at the Tirupathi Temple. pic.twitter.com/AkBwUm5Ozy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 30, 2023
मंदिरात होते स्पेशल पूजा
चेन्नईची टीम जेव्हा-जेव्हा आयपीएलच विजेतेपद मिळवते, तेव्हा ट्रॉफीला मंदिरात नेण्यात येतं. चेन्नईसाठी 5 वा किताब विशेष आहे. चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम बनली आहे. मुंबईकडे सुद्धा 5 विजेतेपद आहेत. मागच्या सीजनमध्ये चेन्नईची टीम 9 व्या स्थानावर होती. पण या सीजनमध्ये धोनीच्या टीमने जबरदस्त खेळ दाखवला. थेट विजेतेपदाला गवसणी घातली. अशी जिंकली टीम
धोनी लवकर आऊट झाला होता. कठीण परिस्थिती होती, त्यावेळी चेन्नईची टीम चॅम्पियन बनली. बेन स्टोक्स मायदेशी परतला होता. चेन्नईने शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सला 5 विकेटने हरवलं. शेवटच्या 2 चेंडूत विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी रवींद्र जाडेजाने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर सिक्स आणि फोर मारुन CSK ला 5 व्यां दा चॅम्पियन बनवलं.