SL vs AFG : एमएस धोनीने ‘त्याच्या’ डोक्यावर ठेवला हात, आता तोच श्रीलंकेला पोहोचवणार वर्ल्ड कपमध्ये
Sri Lanka vs Afghanistan : श्रीलंकेच्या टीमने भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी अजून क्वालिफाय केलेलं नाही. शुक्रवारपासून अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकन टीम 3 वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे.
नवी दिल्ली : IPL 2023 मध्ये धोनीने ज्या गोलंदाजाच्या डोक्यावर हात ठेवला, आता तो श्रीलंकेच शेवटच आशास्थान बनला आहे. श्रीलंकेच्या टीमने थेट वनडे वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय केलेल नाहीय. आता क्वालिफायर्समधून वनडे वर्ल्ड कपमध्ये एंट्री करण्याच श्रीलंकेच स्वप्न आहे. क्वालिफायर्समध्ये श्रीलंकेची टीम पूर्ण ताकदीनिशी उतरेल.
श्रीलंकेची टीम अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरीज खेळणार आहे. त्यावेळी श्रीलंकेला आपल बलस्थान ओळखाव लागेल. शुक्रवारपासून अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकन टीम 3 वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे.
युवा गोलंदाजावर अपेक्षा
क्वालिफिकेशनसाठी श्रीलंकेच्या एका युवा गोलंदाजावर अपेक्षा आहेत. नुकत्याच संपलेल्या IPL 2023 च्या सीजनमध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्या गोलंदाजाच नाव आहे, मथीसा पतिराणा. IPL मध्ये पतिराणा CSK कडून खेळला. एमएस धोनीने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं.
धोनीने त्या गोलंदाजाच्या कुटुंबाला काय सांगितलं?
पतिराणाने आयपीएल 2023 मध्ये कमालीच प्रदर्शन केलं. त्याने 12 सामन्यात 19 विकेट घेतले. टुर्नामेंट दरम्यान एमएस धोनीने पितराणाच्या कुटुंबाला सांगितलं होतं की, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण पतिराणा नेहमी माझ्यासोबत राहील.
?Final training ✅ ahead of 1st ODI ? Afghanistan!
??⚔️?? Tickets: https://t.co/9uxRri0gyU#SLvAFG pic.twitter.com/0nON3K095a
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) June 1, 2023
युवा गोलंदाजाच्या डोक्यावर हात ठेवला
धोनीने श्रीलंकेच्या या युवा गोलंदाजाच्या डोक्यावर हात ठेवला. आता पतिराणा वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून डेब्यु करण्याची तयारी करतोय. अफगाणिस्तानसाठी ही सीरीज वर्ल्ड कपआधी महत्वपूर्ण आहे. श्रीलंकेसाठी वर्ल्ड कप 2023 च्या क्वालिफायर्सआधी वॉर्मअप सारखी असेल. श्रीलंकन टीम मार्चमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज खेळली होती. त्यांनी 0-2 ने ही सीरीज गमावली होती. अफगाणिस्तान विरुद्धच्या सीरीजसाठी श्रीलंकेचा टेस्ट कॅप्टन दिमुथ करुणारत्नेचा टीममध्ये समावेश केलाय. त्याने मार्च 2021 मध्ये शेवटची वनडे सीरीज खेळली होती.