MS dhoni IPL 2023 : अजिंक्य रहाणेनंतर एमएस धोनीमुळे मुंबईच्या दुसऱ्या बॅट्समनच यशस्वी कमबॅक

MS dhoni IPL 2023 : धोनीमुळेच मुंबईचा दुसरा बॅट्समन फॉर्ममध्ये आला. धोनीच योगदान कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याला एक कारण आहे. धोनीमुळेच अजिंक्य रहाणेसारखा प्लेयर फॉर्ममध्ये परतलाय.

MS dhoni IPL 2023 : अजिंक्य रहाणेनंतर एमएस धोनीमुळे मुंबईच्या दुसऱ्या बॅट्समनच यशस्वी कमबॅक
Ajinkay rahane-MS Dhoni
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 11:46 AM

धर्मशाळा : IPL 2023 चा सीजन संपत असताना मुंबईचा एक चांगला प्लेयर फॉर्ममध्ये आलाय. त्याला सूर गवसला आहे. सीजनच्या सुरुवातीपासून मुंबईच्या या प्लेयरचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता. धावा होत नसल्यामुळे त्याला टीममधून ड्रॉप करण्यात आलं. बरेच दिवस तो बेंचवर बसून होता. अखेर 26 दिवसांनी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. इतक्या दिवसांनी टीममध्ये स्थान मिळाल्यानंतर त्याने संधीचा पुरेपूर वापर केला. त्याने कालच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ दाखवला.

फक्त या प्लेयरला उशीरा सूर गवसलाय. सीजन संपत असताना, हा प्लेयर फॉर्ममध्ये आलाय. महत्वाच म्हणजे त्याच्या टीमच IPL 2023 टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात आलय.

टीमचा प्रवास आधीच संपुष्टात आलाय

मुंबईच्या या प्लेयरच नाव आहे, पृथ्वी शॉ. मुंबईचा हा गुणी खेळाडू आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. खराब फॉर्ममुळे बरेच दिवस त्याने बेंचवर बसून काढले. काल पंजाब किंग्स विरुद्ध संधी मिळाल्यानंतर त्याने हाफ सेंच्युरी झळकवली. दिल्ली कॅपिटल्स टीमचा आयपीएलमधील प्रवास आधीच संपुष्टात आलय. डेविड वॉर्नरची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेली आहे. फक्त जाता-जाता या टीमने पंजाब किंग्सचा खेळ बिघडवला.

यशाच श्रेय धोनीला

दिल्लीने पंजाबला 15 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे पंजाबचा स्पर्धेतील पुढचा प्रवास खडतर बनलाय. पृथ्वी शॉ ने या मॅचमध्ये 38 चेंडूत 54 धावा फटकावल्या. पंजाब विरुद्ध पृथ्वीने दाखवलेल्या दमदार खेळाच श्रेय एमएस धोनीला जातं. धोनीमुळे पृथ्वी शॉ यशस्वी कमबॅक करु शकला.

चेन्नईने जिंकलेली मॅच

धर्मशाळामध्ये पृथ्वी शॉ ने बॉलर्सची वाट लावली. याची सुरुवात त्याने 7 दिवस आधीच चेन्नईमध्ये केली होती. एमएस धोनीच यामध्ये योगदान आहे. धोनीमुळे पृथ्वी शॉ ला त्याचा हरवलेला आत्मविश्वास मिळाला, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. 10 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये मॅच झाली. चेन्नईने ही मॅच 27 धावांनी जिंकली होती. चर्चेनंतर हे सर्व घडलं

पृथ्वी शॉ त्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. सामना संपल्यानंतर पृथ्वी धोनीसोबत चर्चा करताना दिसलेला. दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झालेली. या चर्चेचा परिणाम 7 दिवसांनी दिसून आला. पृथ्वी शॉ त्याच्या जुन्या अंदाजात दिसला. या आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ ने 7, 0, 15, 0, 13 आणि 54 धावा केल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.