MS Dhoni IPL 2023 ची ओपनिंग मॅच खेळणार का? CSK च्या सीईओने दिली फिटनेस अपडेट

IPL 2023 मधील ओपनिंग मॅचआधी चेन्नई सुपर किंग्सची टीम अडचणीत येणार? चेन्नई टीमचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या फिटनेसबद्दल महत्वाची अपडेट दिलीय.

MS Dhoni IPL 2023 ची ओपनिंग मॅच खेळणार का? CSK च्या सीईओने दिली फिटनेस अपडेट
MS Dhoni Image Credit source: csk Twitter
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 7:34 AM

IPL 2023 News : आजपासून IPL 2023 च्या सीजनला सुरुवात होत आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये पहिला सामना होणार आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. मागच्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सने आयपीएल डेब्यु केला. पहिल्याच सीजनमध्ये विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या हार्दिक पंड्याच्या टीमसमोर एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच आव्हान आहे. या मॅचआधी धोनीच्या दुखापतीने CSK च्या चाहत्यांच टेन्शन वाढवलय. धोनी ओपनिंग मॅचमध्ये खेळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झालाय.

एमएस धोनी आता 41 वर्षांचा आहे. पण अजूनही त्याची जादू ओसरलेली नाही. त्याला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते आतुर आहेत. पण त्याच्या दुखापतीच्या बातमीने चिंतेत टाकलय.

चाहत्यांना दिलासा ?

आता धोनीच्या दुखापतीबद्दल सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी महत्वाची अपडेट दिलीय. निश्चितच यामुळे चाहत्यांना दिलासा मिळू शकतो.

चेन्नईच्या CEO ने काय सांगितलं?

पहिल्या मॅचआधी सराव सत्रा दरम्यान एमएस धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मॅचआधी फलंदाजीचा सराव केला नाही. पहिल्या सामन्यात धोनीच्या खेळण्याबद्दल अनिश्चितता असल्याच्या बातम्या येत होत्या. पण चेन्नईच्या सीईओने या बातम्या फेटाळून लावल्या. धोनी 100 टक्के फिट असल्याची माहिती विश्वनाथन यांनी पीटीआयला दिली.

सराव न करण्यामागे धोनीची काय रणनिती?

आयपीएलच्या ओपनिंग मॅचमध्ये धोनी खेळला नसता, तर गुजरात विरुद्ध डेवॉन कॉनवे किंवा अंबाती रायडू यांच्यापैकी एक विकेटकिपिंग करताना दिसला असता. मॅचआधी एनर्जी वाचवण्यासाठी धोनीने सराव केला नाही, असं आता सांगितल जातय.

चेन्नई सुपरकिंग्स टीम

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश थिक्शाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, कायले जेमीन्सन, अजय मंडल आणि भगत वर्मा. गुजरात टायटन्स टीम

हार्दिक पांड्या (कॅप्टन), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मैथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे आणि साईं सुदर्शन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.