IPL 2022: धोनीचे फॅन असाल, तर त्याचा हा नवीन जबरदस्त लूक एकदा पहाच VIDEO
IPL 2022 ची तयारी जोरात सुरु आहे. सर्व 10 फ्रेंचायजींनी आपल्या संघाची बांधणी केली आहे. BCCI ने शुक्रवारी लीगच्या आगामी सीजनसाठी तारखांची घोषणा केली आहे.
चेन्नई: IPL 2022 ची तयारी जोरात सुरु आहे. सर्व 10 फ्रेंचायजींनी आपल्या संघाची बांधणी केली आहे. BCCI ने शुक्रवारी लीगच्या आगामी सीजनसाठी तारखांची घोषणा केली आहे. लीगची सुरुवात 26 मार्चला होईल. फायनल 29 मे रोजी खेळली जाईल. प्रेक्षकांना सुद्धा आयपीएल कधी सुरु होणार? त्याची उत्सुक्ता आहे. खासकरुन महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांना. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. आयपीएलच्या पुढच्या सीजनआधी धोनीने नवीन अवतार धारण केला आहे. चेन्नई सुपर किंग्सची जर्सी घालण्याआधी धोनीने नवीन ड्रेस घातला आहे. आयपीएलच्या प्रत्येक सीजनआधी धोनी नेहमी नवीन अवतारात दिसतो. मागच्यावेळी धोनीचा मौंक वाला लुक वायरल झाला होता. यावेळी धोनीने वेगळ रुप धारण केलं आहे.
धोनी बनला ड्रायव्हर
आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने दोन छोटे-छोटे व्हिडिओ जारी केले आहेत. यामध्ये धोनीचं एक वेगळ रुप दिसत आहे. स्टार स्पोर्ट्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी ड्रायव्हर बनला आहे. एक व्हिडिओ अवघ्या पाच सेकंदाचा आहे, त्यात धोनी ड्रायव्हरच्या पोषाखात दिसतो.
Stay Tuned#DhonisNewLook #ComingSoon pic.twitter.com/S17D8L7JPD
— Star Sports (@StarSportsIndia) February 26, 2022
मिशा आणि कुरळ्या केसातला धोनी गाडीला ब्रेक मारताना दिसतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये धोनी पायऱ्यांवर बसला आहे. या दोन्ही व्हिडिओत धोनीने ड्रायव्हरवाला पोषाख परिधान केला आहे. धोनीने आयपीएलच्या पुढच्या सीजनसाठी हा प्रोमो केला आहे. आज टीजर समोर आला. प्रोमो काही दिवसांनी समोर येईल.
Cue the ???, ’cause he is ? in a new avatar!
How did you react to #DhonisNewLook? Let us know with an emoji! pic.twitter.com/Kv6qMr6iz5
— Star Sports (@StarSportsIndia) February 26, 2022
10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार
सर्व 10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार आहेत. 14 मधले सात सामने घरच्या मैदानावर तर सात दुसऱ्या मैदानावर होतील. लीगमध्ये यंदा 60 ऐवजी 74 सामने होतील. प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने खेळेल. चार संघ फक्त एक-एक सामना खेळतील. लीग राऊंडनंतर चार प्लेऑफचे सामने होतील. पण त्यांचं स्थळ आणि तारीख जाहीर झालेली नाही.
ms dhoni new avatar before the ipl 2022 ipl promo gets into the driver dress csk