MS Dhoni Quits Captaincy: कॅप्टनशिप सोडण्याच्या धोनीच्या निर्णयामागची Inside Story, CSK च्या सीईओंनी सांगितलं काय घडलं?
MS Dhoni Quits Captaincy: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) दोन दिवस उरलेले असताना एमएस धोनीने (MS Dhoni) कर्णधारपद सोडण्याचा (MS Dhoni Quits Captaincy) निर्णय घेतला.
MS Dhoni Quits Captaincy: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) दोन दिवस उरलेले असताना एमएस धोनीने (MS Dhoni) कर्णधारपद सोडण्याचा (MS Dhoni Quits Captaincy) निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला असेल. धोनीने अचानक कसा काय निर्णय घेतला? हा प्रश्न त्यांना पडला असेल. पण एमएस धोनीने कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. धोनीने 2014 साली कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला होता. पण यावेळी त्याने असं केलेलं नाही. धोनीने चेन्नई सुपर किंग्सच कर्णधारपद सोडण्याआधी विराट कोहलीची पद्धत अवलंबली आहे. नेतृत्व दुसऱ्याकडे सोपवण्याची प्रक्रिया कशी सहजतेने पार पडेल, ही गोष्ट धोनीने लक्षात घेतली. धोनी CSK चा यशस्वी कॅप्टन आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचे चार वेळा आणि चॅम्पियन्स लीगचं दोन वेळा विजेतेपद मिळवलं. धोनीने चेन्नईची टीमची अशी बांधली होती की, त्या संघाने फारसे पराभव पाहिले नाहीत. धोनी एक चणाक्ष, हुशार कर्णधार आहे. त्याने प्रत्येक खेळाडूचा खूप हुशारीने वापर करुन घेतला.
सहकाऱ्यांना कधी कल्पना दिली ?
“धोनी आधीपासूनच कर्णधारपद सोडण्याचा विचार करत होता. फक्त तो योग्य वेळेच्या प्रतीक्षेत होता” असं चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं. “आज सराव संपल्यानंतर टीम मीटींगमध्ये धोनीने सीएसकेची कॅप्टनशिप सोडत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. तो आधीपासूनच या बद्दल विचार करत होता. धोनीच्या मते जड्डू म्हणजे रवींद्र जाडेजा कॅप्टनशिप स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे” असे सीएसकेच्या CEO नी सांगितलं.
त्याने विराटची पद्धत अवलंबली
एमएस धोनीने कॅप्टनशिप सोडताना, विराट कोहलीची पद्धत अवलंबली. विराटने सुद्धा आपला निर्णय सार्वजनिक करण्याआधी टीम मीटींगमध्ये कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याची माहिती दिली होती.
धोनीने प्लेइंग इलेवनमध्ये असेल?
“एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एमएसबद्दल बोलताय. तो नेहमी त्याच्या प्लाननुसार चालतो. अजून एकवर्ष त्याने कर्णधारपद भूषवलं असतं. पण जाडेजा कॅप्टनशिपसाठी तयार आहे. संघ नवीन असल्यामुळे नव्या कॅप्टनला पहिल्या सीजनपासून नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, असा विचार धोनीने केला असावा” असं विश्वनाथन यांनी सांगितलं. धोनीने अजून निवृत्ती जाहीर केलेली नाही. धोनीचा तसा सध्या टच नाहीय. त्यामुळे तो प्लेइंग इलेवनमध्ये असेल का? याबद्दल सीएसकेच्या सीईओनी काहीही बोलण्यास नकार दिला.
धोनी कॅप्टन असो किंवा नसो, तो….
“धोनी कॅप्टन असो किंवा नसो, तो सीएसकेचा एक अविभाज्य भाग आहे. धोनी अजूनही विकेटकीपर आहे. निर्णय प्रक्रियेत त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. भविष्याचा विचार करता, तो चेन्नई सुपर किंग्सच प्रतिनिधीत्व करत राहील” असं विश्वनाथन म्हणाले.