IPL 2022: धोनीने जड्डूला दिलेला शब्द पाळला, जडेजाकडे CSK ची कमान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

धोनीने चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडण्याआधी विराट कोहलीची पद्धत अवलंबली आहे. नेतृत्व दुसऱ्याकडे सोपवण्याची प्रक्रिया कशी सहजतेने पार पडेल, ही गोष्ट धोनीने लक्षात घेतली.

IPL 2022: धोनीने जड्डूला दिलेला शब्द पाळला, जडेजाकडे CSK ची कमान, जाणून घ्या नेमकं काय  घडलं?
MS Dhoni and Ravindra Jadeja (CSK)Image Credit source: Chennai Super Kings
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 9:41 AM

मुंबई : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) दोन दिवस उरलेले असताना एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्स संघाचे कर्णधारपद सोडण्याचा (MS Dhoni Quits Captaincy) निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला असेल. धोनीने अचानक कसा काय निर्णय घेतला? हा प्रश्न त्यांना पडला असेल. पण एमएस धोनीने कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. धोनीने 2014 साली कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला होता. पण यावेळी त्याने असं केलेलं नाही. धोनीने चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोडण्याआधी विराट कोहलीची पद्धत अवलंबली आहे. नेतृत्व दुसऱ्याकडे सोपवण्याची प्रक्रिया कशी सहजतेने पार पडेल, ही गोष्ट धोनीने लक्षात घेतली. धोनी CSK चा यशस्वी कॅप्टन आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचे चार वेळा आणि चॅम्पियन्स लीगचं दोन वेळा विजेतेपद मिळवलं. धोनीने चेन्नईची टीमची अशी बांधली होती की, त्या संघाने फारसे पराभव पाहिले नाहीत. धोनी एक चणाक्ष, हुशार कर्णधार आहे. त्याने प्रत्येक खेळाडूचा खूप हुशारीने वापर करुन घेतला.

धोनीचा CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय नवीन आणि संपूर्ण जगासाठी आश्चर्यचकित करणारा होता, पण रवींद्र जडेजाला 3 महिने आधीच याची कल्पना होती. धोनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जडेजाला याबाबत सांगितले होते आणि आता फक्त त्याने जडेजा दिलेला शब्द पाळला आहे. धोनीचा हा निर्णय सर्वांसाठी नवीन असला तरी धोनीने जडेजाला तीन महिने आधीच कल्पना देऊन त्याला मानसिकरित्या तयार केलं होतं.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली होती, तेव्हा जडेजा दुखापतीमुळे संघासोबत गेला नव्हता. आणि, तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला. न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हीच वेळ होती जेव्हा धोनीने जडेजाला सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याच्या शक्यतांबद्दल सांगितले होते.

धोनीचा निर्णय आधीच झालेला…

“धोनी आधीपासूनच कर्णधारपद सोडण्याचा विचार करत होता. फक्त तो योग्य वेळेच्या प्रतीक्षेत होता” असं चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं. “आज सराव संपल्यानंतर टीम मीटींगमध्ये धोनीने सीएसकेची कॅप्टनशिप सोडत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. तो आधीपासूनच याबद्दल विचार करत होता. धोनीच्या मते जड्डू म्हणजे रवींद्र जाडेजा कॅप्टनशिप स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे” असे सीएसकेच्या CEO नी सांगितलं.

धोनीने प्लेइंग इलेवनमध्ये असेल?

“एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एमएसबद्दल बोलताय. तो नेहमी त्याच्या प्लाननुसार चालतो. अजून एकवर्ष त्याने कर्णधारपद भूषवलं असतं. पण जाडेजा कॅप्टनशिपसाठी तयार आहे. संघ नवीन असल्यामुळे नव्या कॅप्टनला पहिल्या सीजनपासून नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, असा विचार धोनीने केला असावा” असं विश्वनाथन यांनी सांगितलं. धोनीने अजून निवृत्ती जाहीर केलेली नाही. धोनीचा तसा सध्या टच नाहीय. त्यामुळे तो प्लेइंग इलेवनमध्ये असेल का? याबद्दल सीएसकेच्या सीईओनी काहीही बोलण्यास नकार दिला.

धोनी कॅप्टन असो किंवा नसो, तो….

“धोनी कॅप्टन असो किंवा नसो, तो सीएसकेचा एक अविभाज्य भाग आहे. धोनी अजूनही विकेटकीपर आहे. निर्णय प्रक्रियेत त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. भविष्याचा विचार करता, तो चेन्नई सुपर किंग्सच प्रतिनिधीत्व करत राहील” असं विश्वनाथन म्हणाले.

इतर बातम्या

LIVE चर्चेत अचानक Harsha Bhogle यांना काय झालं? Video पाहून चाहत्यांना धक्का, नेमकं काय झालं?

MS Dhoni Quits CSK Captaincy: असा आहे धोनीचा IPL ट्रॅक रेकॉर्ड, किती विजय, किती पराभव, जाणून घ्या सर्व डिटेल्स

PAK VS AUS: Shaheen Afridi ने आधी वॉर्नरला ठसन दिली, आता दांडी उडवली, एकदा बघाच, हा ‘कडक’ VIDEO

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.