Dhoni : अनंत अंबानीच्या लग्नाला धोनी पोहोचला नव्या लूकमध्ये, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंगह धोनी हा त्याच्या लूकमुळे नेहमतीच चर्चेत असतो. तो नेहमी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत असतो. धोनी आता पुन्हा एकदा नव्या लूकमध्ये दिसला आहे, धोनीचा हा कूल लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. धोनी पुन्हा एकदा त्यामुळे चर्चेत आला आहे.

Dhoni : अनंत अंबानीच्या लग्नाला धोनी पोहोचला नव्या लूकमध्ये, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 8:58 PM

MS Dhoni new Look : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी त्याच्या लूक आणि नवीन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. धोनीने आपला लूक पुन्हा एकदा बदलला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. माहीचा हा लूक आणि त्याचा फिटनेस यावर चाहते खूश झाले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये सहभागी होण्यासाठी तो जामनगरला पोहोचला आहे. या खास कार्यक्रमा आधी त्याचा फोटो आणि त्याचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. धोनी पूर्वीपेक्षा खूपच स्टायलिश आणि फिट दिसत आहे.

महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली. व्हायरल फोटोंमध्ये माही अगदी साध्या लूकमध्येही खूपच स्टायलिश दिसत आहे. फोटोमध्ये धोनी मरून रंगाचा हाफ टी-शर्ट आणि काळी कार्गो पॅन्ट घातलेला दिसत आहे.

धोनीने केस पुन्हा एकदा वाढवले आहेत. यासोबतच त्याने हाफ टी-शर्टमध्ये बायसेप्सही दाखवले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांना माजी भारतीय कर्णधाराचा हा लूक खूप आवडला आहे.

एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामात रंग भरताना दिसणार आहे. माहीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने गेल्या मोसमात विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला.

सीएसकेला चॅम्पियन बनवल्यानंतर माहीने चाहत्यांच्या हितासाठी पुढच्या हंगामात आयपीएलमध्ये खेळताना दिसणार असल्याचे जाहीर केले होते. इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.