कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!

भारताचा माजी कर्णधार 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. पण 2014 मध्येच त्याने कसोटी क्रिकेटला राम राम केला होता.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!
एम एस धोनी
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 7:00 PM

लंडन : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्र सिंह धोनी. आयसीसीच्या महत्त्वाच्या तिन्ही स्पर्धांत भारताला धोनीने विजय मिळवून दिला होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये धोनी तितका यशस्वी ठरला नाही. त्यामुळेच निवृत्तीच्या 6 वर्ष आधीच त्याने कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला होता. मात्र इंग्लंडमध्ये धोनीने केलेला एक कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड आजही कायम आहे. त्याच्या जवळपास कोणताच फलंदाज पोहोचलेला नाही. (MS Dhoni Record of Most 50 Plus Scores in Test Against England is Stil record)

काय आहे रेकॉर्ड?

महेंद्र सिंह धोनीच्या नावावर इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंड संघाविरोधात सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम आहे. धोनीने इंग्लंडमध्ये 7 टेस्ट मॅचमध्ये 8 डावांत प्रत्येक वेळेस 50 हून अधिक धावा बनवल्या. धोनी शतक जरी ठोकू शकला नसला तरी 92 हा त्याचा सर्वाधिक स्कोर होता. या 8 डावांत त्याने 604 धावा केल्या. 100.66 च्या सरासरीने धोनीने या धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 7 वर्षानंतरही हा रेकॉर्ड कोणत्याही फलंदाजाना तोडता आलेला नाही.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर

भारतीय क्रिकेट संघ सझ्या इंग्लंडमध्ये असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची (WTC Final) तयारी करत आहे. या सामन्यानंतर संघ इंग्लंडसोबत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाची इंग्लंड विरोधात कसोटी कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. कारण मागील 10 वर्षांत हा भारतीय संघाचा चौथा दौरा असून भारत इंग्लंडसोबत 14 कसोटी सामने खेळला आहे. ज्यात केवळ दोन जिंकला असून एक ड्रॉ झाला आहे. तर 11 सामन्यांत भारत पराभूत झाला आहे. त्यामुळे यंदा युवा खेळाडू काय कमाल करणार हे पाहावं लागेल.

हे ही वाचा :

इंग्लंडचा दौरा म्हणजे Danger Zone,’या’ भारतीय क्रिकटपटूंची कारकिर्द आली संपुष्टात, यंदा युवा खेळाडूंवर टांगती तलवार

तीन भारतीय क्रिकेटपटू अटकेत, मॅच फिक्सिंगप्रकरणी दिग्गज फलंदाजाकडून गुन्हा कबूल, क्रिकेट जगतात भूकंप

रोहित शर्मा की विराट कोहली, टी-20 बेस्ट बॅट्समन कोण? गावस्करांनी सांगितलं तिसरंच नाव!

(MS Dhoni Record of Most 50 Plus Scores in Test Against England is Stil record)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.