IPL 2021: आयपीएलचे मातब्बर संघ फुटबॉल खेळण्यात रंगले, चेन्नईच्या धोनीचा तर दिल्लीच्या श्रेयसचा अप्रतिम गोल, पाहा VIDEO

IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांना युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. सध्या आयपीएलचे बहुतेक संघ युएईत पोहोचले असून सरावासह मजा मस्ती करण्यात खेळाडू व्यस्त आहेत.

IPL 2021: आयपीएलचे मातब्बर संघ फुटबॉल खेळण्यात रंगले, चेन्नईच्या धोनीचा तर दिल्लीच्या श्रेयसचा अप्रतिम गोल, पाहा VIDEO
एम एस धोनी
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 4:14 PM

दुबई : उर्वरीत आयपीएलसाठी (IPL 2021) सर्व संघ सज्ज झाले आहेत. बहुतेक संघ युएईला (UAE) पोहोचले असून सरावाला अनेकांनी सुरुवात केली आहे. तर काही संघ सध्या विलगीकरणात आहेत. दरम्यान सराव सुरु असलेल्या संघापैकी अनेक संघ विविध प्रकारचे खेळ खेळून स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्स (CSK), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या संघाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईचे खेळाडू पाण्यात वॉलीबॉल खेळत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. आता चेन्नई आणि दिल्लीचे खेळाडू फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

सध्या दुबईमध्ये असणारा चेन्नईचा संघ आपआपसांत सराव म्हणून फुटबॉलच्या मॅचेस खेळत आहे. या सामन्यात सर्व खेळाडू खेळत असले तरी सर्वात चांगला खेळ संघाचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार धोनीचाच दिसून येत आहे. धोनीने एका व्हिडीओमध्ये मारलेला उत्कृष्ट हेडर तर सर्वांचीच मनं जिंकत आहे. धोनीचं फुटबॉल प्रेम कायमच दिसून येतं.  मुंबईतही तो ऑल स्टार्स एफसीकडून चॅरीटी मॅचेसमध्ये खेळताना दिसला आहे.

दुसरीकडे नुकताच विलगीकरणाचा कालावधी संपवून सरावसाठी मैदानात उतरलेले दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडूही फुटबॉल खेळताना दिसून आले. यावेळी श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा यांसारखे खेळाडू फुटबॉलने अप्रतिम किक मारत असल्याचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दिल्लीचा कर्णधार कोण?

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे क्रिकेट मैदानापासून दूर होता. त्यामुळे IPL 2021 च्या आधीच्या पर्वात तो खेळू शकला नव्हता. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. सध्या तो युएईमध्ये संघासोबत कसून सरावही करत आहे. दरम्यान अय्यर नसताना दिल्लीचं कर्णधारपद ऋषभ पंतला सोपवण्यात आलं होतं. दिल्लीने पंतच्या नेतृत्त्वाखाली उत्तम कामगिरी देखील केली. त्यामुळे आता दुसऱ्या पर्वात पंतलाच कर्णधार ठेवणार की पुन्हा अय्यरला कर्णधारपद सोपवणार हे पाहावं लागेल.

इतर बातम्या

IPL 2021: आरसीबीचा संघ कर्णधार विराट शिवाय युएईला रवाना, संघामध्ये काही महत्त्वाचे बदल

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(MS dhonis csk team playing football and Shryeas iyers delhi capitals enjoying Football)

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.