IPL 2021: ‘धोनी स्टाईल’ने सामना संपवत चेन्नई विजयी, हैद्राबादला 6 गडी राखून दिली मात, प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान

गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने त्यांच्या नावाला साजेसा खेळ करत सनरायजर्स हैद्राबाद संघावर 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. यासोबतच त्यांनी प्लेऑफमध्येही स्थान मिळवलं आहे. तर हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

IPL 2021: 'धोनी स्टाईल'ने सामना संपवत चेन्नई विजयी, हैद्राबादला 6 गडी राखून दिली मात, प्लेऑफमध्येही मिळवलं स्थान
महेंद्रसिंह धोनी
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 11:22 PM

IPL 2021: यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत अव्वल असणारा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ हैद्राबादवर विजय मिळवत प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. विशेष म्हणजे शेवटच्या षटकात 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना एम एस धोनीने त्याच्या स्टाईलमध्ये उत्तुंग असा षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयाप्रमाणे हा षटकार धोनीने ठोकला. चेन्नईने 6 गडी राखून हैद्राबादवर विजय मिळवला आहे.

सामना तसा बऱ्यापैकी चुरशीचा झाला. हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 134 धावाच केल्या. पण चेन्नईचे सलामीवीर सोडता इतर फलंदाज फेल झाल्याने हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. पण अखेर धोनीच्या षटकाराने सामना चेन्नईने खिशात घातला. हा विजय चेन्नईसाठी फार महत्त्वाचा ठरला. कारण या विजयासोबत त्यांनी 11 पैकी 9 सामने जिंकत 18 गुण खात्यात मिळवले आहेत. ज्यामुळे त्यांनी पुढील फेरीत अर्थात प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात प्लेऑफच्या फेरीत जाणारा चेन्नई पहिला संघ ठरला आहे. तर दुसरीकडे 11 पैकी 9 सामने पराभूत झाल्यामुळे हैद्राबादचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

जेसन रॉयकडून निराशा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून मोठा स्कोर होईल अशी आशा सर्वांना होती. संघ शारजाहच्या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडेल असे वाटत होते. त्यातच मागील सामन्यातचं संघात समाविष्ट झालेला जगाती उत्तम टी 20 फलंदाज जेसन रॉयही चांगली कामगिरी करेल असे वाटत होते. पण तो केवळ 2 धावा करुन बाद झाला. संपूर्ण संघामध्ये रिद्धिमान साहाने 44 धावा करत एकहाती झुंज दिली.

पण त्याला सोबत न मिळाल्याने संघ मोठी धावसंख्या करु शकला नाही. साहाशिवाय अब्दुल आणि अभिषेक यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. ज्यामुळे 20 षटकात हैद्राबादचा संघ केवळ 134 धावांच करु शकला. याऊलट चेन्नईकडून गोलंदाजीही चोख झाली. जोश हेझलवुडने एका षटकात दोन विकेट घेत संपूर्ण सामन्यात 3 विकेट घेतल्या. याशिवाय़ ब्राव्होने 2 आणि जाडेजा आणि ठाकूरने प्रत्येकी एक विकेट घेतला.

चेन्नईचे सलामीवीर पुन्हा चमकले

हैद्राबादने समोर ठेवलेल्या 135 धावाचं आव्हान करताना चेन्नईचे सलामीवीर फाफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड यां यांनी पुन्हा उत्तम कामगिरी केली. दोघांची अर्धशतकं थोडक्यात हुकली पण त्याच्या खेळीने चेन्नईला सामना जिंकण्यात मोठी मदत केली. गायकवाडने 38 चेंडूत 45 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार खेचले. तर फाफने 36 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने 3चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यांच्यानंतर मधली फळी पटपट बाद झाली पण अखेर रायडू आणि धोनीने अनुक्रमे नाबाद 17 आणि 14 धावा करत सामना चेन्नईच्या खिशात घातला.

हे ही वाचा

T20 World cup मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे भारत पराभूत होणार, माजी पाकिस्तानी खेळाडूचा दावा

IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, ‘बॉटल आणि शूज’ आहेत यामागील कारण

AUSW vs INDW, 1st Test: स्मृती मंधानाची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत भारताची दमदार सुरुवात

(MS Dhonis CSK Won Match Against SRH with 6 wickets remaining Dhoni finishes off in style)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.