PSL 8 : पीएसएलची मॅच सुरु होण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची निघाली अब्रू

PSL 8 : मॅच सुरु झाल्यानंतर चाहत्यांनी सामन्याचा आनंद घेतला. लाहोरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 175 धावा केल्या. मुल्तान सुल्तांसच्या टीम एक रन्सने ही मॅच गमावली.

PSL 8 : पीएसएलची मॅच सुरु होण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची निघाली अब्रू
psl match Image Credit source: pcb twitter
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 3:51 PM

लाहोर : पाकिस्तान सुपर लीगचा 8 वा सीजन सुरु झालाय. सोमवारी मुल्तान येथे लीगमधला पहिला सामना झाला. या मॅचमध्ये मुल्तान सुल्तांसला 1 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला. लाहोर कंलदर्सने पहिली मॅच जिंकली. हा रोमांचक सामना सुरु होण्याआधी एक दुर्घटना घडली. त्यामुळे पीसीबीची फजिती झाली आहे. पीएसएल-8 सुरु होण्याआधी मुल्तान स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना घडली असती. मॅच सुरु होण्याच्या काहीवेळ आधी मुल्तान स्टेडियमच्या फ्लड लाइटमध्ये आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली. त्यामुळे मॅच सुरु होण्याआधीच अचानक फ्लड लाइट्स बंद झाल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पीसीबीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

अचानक आग भडकली

फ्लड लाइटमध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमुळे मॅच उशिराने सुरु झाली. मॅच सुरु झाल्यानंतर चाहत्यांनी सामन्याचा आनंद घेतला. लाहोरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 175 धावा केल्या. मुल्तान सुल्तांसच्या टीम एक रन्सने ही मॅच गमावली. एकवेळ मुल्तानचा स्कोर एकही विकेट न गमावता 100 रन्स होता.

पण शान मसूद बाद होताच त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद रिजवानने नाबाद 75 धावा केल्या. पण त्यांची टीम हरली. शेवटच्या चेंडूवर मुल्तानला विजयासाठी 6 धावांची गरज होती. खुशदिल शाहने चौकार मारला. पण मुल्तानच्या टीमने मॅच गमावली होती. शाहीन आफ्रिदीच्या टीमचा विजय

लाहोर कंलदर्सचा कॅप्टन शाहीन आफ्रिदीने जबरदस्त खेळ दाखवला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 27 धावा देऊन 1 विकेट काढला. हॅरिस रौफला सुद्धा एक विकेट मिळाला. शाहीनने मोहम्मद रिजवानची विकेट काढून मॅच फिरवली. हॅरिस रौफने डेविड मिलरला बाद करुन मुल्तानचा पराभव निश्चित केला.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.