IPL 2021: कुंग-फू पंड्याच्या धमाकेदार खेळीची झलक, मुंबईचा 6 विकेट्सनी पंजाबवर विजय!

मंगळवारी (28 सप्टेंबर) यंदाच्या हंगामातील 42 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये खेळवला गेला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मुंबईने पंजाबवर 6 विकेट्सनी विजय मिळवला.

IPL 2021: कुंग-फू पंड्याच्या धमाकेदार खेळीची झलक, मुंबईचा 6 विकेट्सनी पंजाबवर विजय!
हार्दीक पंड्या
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 12:01 AM

IPL 2021: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (MI vs PBKS) या दोन्ही संघात झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार असा सहा गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे या सामन्यांत कुंग-फू पंड्या अर्थात हार्दीक पंड्याच्या (Hardik Pandya) धमाकेदार खेळीची झलक दिसली. त्याने 30 चेंडूत दमदार अशा नाबाद 40 धावा ठोकत सामना संपवला. त्याच्याआधी सौरभ तिवारीने (Saurabh Tiwari) अवघड वेळी 45 धावाही मुंबईच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.

मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामना अत्यंत कमी धावांचा झाला. यात आधी मुंबईने पंजाबला 135 धावांवर रोखलं. तर पंजाबनेही उत्तम गोलंदाजी केली. यावेळी दोन्ही संघाकडून एका-एका खेळाडूने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंजाबकडून आज संघात पुनरागमन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्करमने 29 चेंडूत 42 धावांची खेळी केली. त्याच्यासारखी खेळी इतर कोणालाच पंजाबकडून आज जमली नाही. तर मुंबईकडून सौरभ तिवारीने एकहाती झुंज देत 37 चेंडूत 45 धावा केल्या. ज्यानंतर अखेर पंड्याने 40 धावा ठोकत पोलार्डच्या नाबाद 15 धावांच्या मदतीने सामना जिंकवून दिला.

मुंबईची भेदक गोलंदाजी

सामन्यात आधी गोलंदाजीचा घेतलेला मुंबई संघाचा निर्णय गोलंदाजांनी बरोबर करुन दाखवला. पंजाबच्या संघाला 20 षटकात 135 धावांपर्यंतच मजल मारुन दिली. यावेळी मुंबईच्या गोलंदाजानी सर्व फलंदाजाना जेरीस आणलं. केवळ मार्करम (42) आणि हुडा (21) यांची एक उत्तम भागिदारी झाल्याने पंजाबने 135 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान मुंबईकडून पोलार्ड आणि बुमराहने प्रत्येकी दोन आणि राहुल चाहर, कृणाल पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतला.

पंजाबची कडवी झुंज अपयशी

मुंबईला 136 धावांचे आव्हान पंजाबने दिले होते. मुंबईच्या फलंदाजीतील खोली पाहून हे आव्हान त्यांच्यासाठी क्षुल्लक होते. पण पंजाबच्या गोलंदाजांनी कडवी झुंज दिली. यामध्ये युवा गोलंदाज रवी बिश्नोईने त्याच्या पहिल्याच षटकात कर्णधार रोहितसह सूर्यकुमारची विकेट घेत मोठी कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याला एकही विकेट घेता आली नाही. याशिवाय शमी आणि एलीस यांनी एक एक विकेट घेतली. सामना 19 व्या षटकापर्यंत गेला. पण त्याचवेळी शमीच्या एका षटकात पंड्याने 17 धावा ठोकत सामना मुंबईला जिंकवून दिला.

हे ही वाचा

DC vs KKR: दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याला वादाचे गालबोट, सामना सुरु असतानाच मॉर्गनच्या अंगावर आला आश्विन, पाहा VIDEO

IPL 2021: दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात कोलकात्याला यश, 3 गडी राखून मिळवला दमदार विजय

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू इंझमाम-उल-हकला हृदयविकाराचा झटका, सचिनने भावनिक पोस्ट करत व्यक्त केल्या भावना, म्हणाला…

(Mumbai Indian Won Match Against Punjab kings with 6 wickets remaining hardik pandya scores 40 runs)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.