मुंबईने खेळवले देखील नाही, आता केकेआरकडून संधी मिळताच संधीचं सोनं

मुंबई इंडियन्सने शेवटच्या सीजनमध्ये ज्याला खेळण्याची जास्त संधीच दिली नाही त्या खेळाडूला आता केकेआरने आपल्या संघात सहभागी करुन घेतलं आहे. फक्त २० लाखाला त्याला खरेदी केल्यानंतर गौतम गंभीरने पहिल्यास सामन्यात त्याला संधी दिली आणि त्याने संधीचे सोनं केलं.

मुंबईने खेळवले देखील नाही, आता केकेआरकडून संधी मिळताच संधीचं सोनं
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 9:51 PM

आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगला. कोलकाताची सुरुवात खराब झाली होती. फिल सॉल्टशिवाय टॉप-5मधील कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. 51 धावांवर 4 विकेट पडल्यानंतर केकेआरने रमणदीप सिंगला फलंदाजीसाठी पाठवले. संघाकडे रिंकू सिंग आणि आंद्रे रसेलचा पर्याय होता, तरीही गौतम गंभीरने पंजाबच्या या फलंदाजावर विश्वास व्यक्त केला.

रमणदीप सिंगने 4 सिक्स ठोकले

संघ कठीण परिस्थितीत असताना रमणदीप सिंगला संधी मिळाली, त्याने संधीचं सोनं केलं. पॅट कमिन्सविरुद्ध हैदराबादविरुद्ध त्याने एकाच ओव्हरमध्ये एक सिक्स आणि एक फोर मारला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने मयंक मार्कंडेविरुद्ध 90 मीटर लांब सिक्स मारला. यानंतर कमिन्सने मार्को यानसेनकडे बॉ़ल दिला. रमणदीप सिंगने त्याला ही सिक्स ठोकला. शाहबाज अहमदविरुद्धच्या पुढच्या षटकात त्याने इन साईड आऊट शॉट खेळला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला़.

200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी

रमणदीप सिंगने चार सिक्स मारले. 13व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पॅट कमिन्सने त्याला बाद केले. मार्कंडेने अप्रतिम झेल घेतला. आऊट होण्यापूर्वी रमणदीपने १७ बॉलमध्ये ३५ धावांची खेळी खेळली. या खेळीत 1 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तो पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा केकेआरने शंभरची धावसंख्या ओलांडली होती. अडचणीतही संघ पुढे आला होता.

मुंबई इंडियन्सने बेंचवर ठेवले

रमणदीप सिंग आयपीएलच्या शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग होता. पण संपूर्ण हंगाम तो बेंचवरच राहिला. त्यानंतर मुंबईने त्याला लिलावापूर्वी सोडले. केकेआरने या खेळाडूला अवघ्या 20 लाखांमध्ये खरेदी केले. आता पहिल्याच सामन्यात संधी मिळाल्यानंतर रमणदीप सिंगने मुंबई इंडियन्सला आपल्या चुकीची जाणीव करून दिली आहे.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.