MI vs KKR : कॅप्टन हार्दिककडून अश्वनी कुमारच्या कामगिरीचं श्रेय दुसऱ्यांनाच, म्हणाला….
Hardik Pandya On Ashwani Kumar : केकेआरविरुद्धच्या सामन्यात अश्वनी कुमार याने पदार्पणात 4 विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधलं. मात्र कर्णधार हार्दिक पंड्या याने अश्वनी कुमारच्या कामगिरीबाबत बोलताना त्याचं श्रेय कुणाला दिलं? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात (IPL 2025) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 8 विकेट्सने धुव्वा उडवला. मुंबईचा हा या हंगामातील आणि घरच्या मैदानातील पहिलावहिला विजय ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या या विजयात डेब्यूटंट अश्वनी कुमार याने निर्णायक भूमिका बजावली. अश्वनीने पदार्पणात 4 विकेट्स घेतल्या. तसेच रायन रिकेल्टन याने 62 धावांची खेळी केली. अश्वनी कुमार याच्यानंतर रायनने मुंबईला विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली.
मुंबईच्या गोलंदाजांनी विजयाचा पाया रचला. अश्वनीने 3 ओव्हरमध्ये 24 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहर याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच इतर 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत कोलकाताला गुंडाळलं. मुंबईच्या या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने सांघिक विजयाचं कौतुक केलं.
हार्दिक पंड्या काय म्हणाला?
“हा समाधनकारक विजय आहे. घरातील विजयामुळे आनंद द्विगुणित झाला आहे. आम्ही एक होऊन आणि टीम म्हणून खेळू शकलो त्यामुळे हा विजय खास आहे. आमची टीम व्यवस्थित दिसत आहे”, असं हार्दिक पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान म्हणाला.
मुंबईसाठी गोलंदाजांनंतर फलंदाजांनीही त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. यामुळेच मुंबईला एकतर्फी विजय मिळवता आला. मुंबईच्या गोलंदाजांनी आधी केकेआरला 116 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर फलंदाजांनी 13 ओव्हरआधीच हे विजयी आव्हान पूर्ण केलं.
हार्दिक अश्वनी कुमारबाबत काय म्हणाला?
Hardik Pandya said “All credit to the scouts, they go all over the country”. [Talking about Ashwani Kumar] pic.twitter.com/dH1sULL59r
— Johns. (@CricCrazyJohns) March 31, 2025
हार्दिकने पदार्पणात 4 विकेट्स घेणाऱ्या अश्वनीचं भरभरुन कौतुक केलं. “ही खेळपट्टी आमच्यासाठी खास ठरली. अश्वनी इथे निर्णायक भूमिका बजावेल, असं आम्ही विचार केलेला. अश्वनिने तसंच करुन दाखवलं. मुंबई इंडियन्सच्या स्काउट्स टीमने या युवा खेळाडूंना इथे आणलं आहे. एमआय स्काउट्स टीमने सर्व ठिकाणी जाऊन या तरुण मुलांना निवडलं आहे”, असं म्हणत हार्दिकने अश्वनीसारख्या खेळाडूंना शोधून आणण्याचं श्रेय एमआय स्काउट्स टीमला दिलं.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.