VIDEO: रोहित शर्माची मजा-मस्ती सुरुच, आणखी 3 खेळाडूंचीही केली नकलं, पाहा तुम्ही ओळखू शकता का?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. मागील काही काळापासून तो विविध खेळाडूंची नकल करत असून त्याने आज आणखी एक नवा व्हिडीओ टाकला आहे.

VIDEO: रोहित शर्माची मजा-मस्ती सुरुच, आणखी 3 खेळाडूंचीही केली नकलं, पाहा तुम्ही ओळखू शकता का?
रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 8:06 PM

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या पर्वात अद्यापपर्यंत प्लेऑफमध्ये न पोहोचलेला संघ मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ सध्या त्यांच्या सनरायजर्स हैद्राबाद (SRH) विरुद्धच्या सामन्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) काही मजेशीर व्हिडीओ तयार करुन आपला ताण हलका करत आहे. नुकताच त्याने काही दिग्गज क्रिकेटपटूंच्या नकला करणारा व्हिडीओ केला होता. ज्यात त्याने सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि हरभजन सिंग यांची नकलं केली होती. त्यानंतर त्याने आता आणखी तीन क्रिकेटपटूंच्या नकला केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी पत्नी रितीकासोबत प्रँक व्हिडीओ केल्यानंतर रोहितने प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करणारा व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये तो 10 सेकंदाची तीन प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नकलं करतो आणि चाहत्यांना ओळखायला सांगतो. त्याव्हिडीओमध्ये असणारे खेळाडू कोण? यावर अनेक क्रिकेटपटूंसह नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या होत्या. ज्यात पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर आणि शेवटचा हरभजन सिंग हे तर सर्वांना कळतं. पण मधला खेळाडू कोण? यावर अनेक वेगळी उत्तरं होती. ज्याचं बरोबर उत्तर हे राहुल द्रविड असं होतं.

आताचे तीन खेळाडू कोण?

नव्याने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये असणारे तीन क्रिकेटपटू कोण? यावरही अनेक कमेंट्स येत आहेत. ज्यामध्ये पहिला खेळाडू अष्टपैलू स्टार क्रिकेटर युवराज सिंग, मधला खेळाडू गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आणि शेवटचा खेळाडू झहीर खान असं म्हटलं जात आहे. पण नेमकं उत्तर हे रोहितंच पुढच्या व्हिडीओ वेळी देईल. तोवर व्हिडीओ पाहून तुम्हीही गेस करा

चौथ्या स्थानासाछी केकेआर आणि मुंबईत चुरस

सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.

हे ही वाचा

VIDEO: भारीच! भारताला मिळाला वकार युनिससारखा गोलंदाज, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या उम्रानची बोलिंग अॅक्शन एकदा पाहाच!

शोएब अख्तरचा वेग अजूनही तसाचं, मैदानावर पुन्हा उतरत भेदक गोलंदाजी, पाहा VIDEO

IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO

(Mumbai Indians Captain Rohit Sharma does action of famous cricketers guess the players see video)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.