IPL 2022 Mumbai Indians: रोहितच्या मनात कॅप्टनशिप सोडण्याचा विचार? इमोशनल टि्वटनंतर चाहतेही झाले भावुक
IPL 2022 Mumbai Indians: पण तोच मुंबई इंडियन्सचा संघ आता अडखळतोय, धडपडतोय. संघात सर्वकाही आलबेल नसल्याची बाहेर चर्चा होत आहे.
मुंबई: यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने आतापर्यंत लाजिरवाणं प्रदर्शन केलं आहे. सलग आठ सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. इतकी खराब कामगिरी मुंबई इंडियन्सने कुठल्याही सीजनमध्ये केली नव्हती. मुंबईच्या या खराब प्रदर्शनामुळे कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit sharma) प्रचंड दबाव आहे. मैदानावर रोहित वावरताना हा दबाव दिसून येतो. मुंबई इंडियन्सचा काल लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow super giants) पराभव केला. लखनौ आयपीएलमधला नवीन संघ आहे. त्यांनी यंदाच्या सीजनमध्ये दुसऱ्यांदा मुंबईचा पराभव केला आहे. कधी फलंदाजी खराब होते, तर कधी गोलंदाजी. टीम म्हणून मुंबई इंडियन्सचं प्रदर्शन दिसलेलं नाही. कधी गोलंदाजांमुळे सामना गमावला, तर कधी फलंदाजांमुळे. खरंतर मुंबई इंडियन्स आयपीएलमधला एक यशस्वी संघ आहे.
आता मुंबईचा संघ अडखळतोय, धडपडतोय
त्यांनी आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. अशी कामगिरी करणं दुसऱ्या कुठल्याही संघाला जमलेलं नाही. पण तोच मुंबई इंडियन्सचा संघ आता अडखळतोय, धडपडतोय. संघात सर्वकाही आलबेल नसल्याची बाहेर चर्चा होत आहे.
We are always with you Champ ? @ImRo45
— Believer!!! (@HumanTsunaMEE) April 25, 2022
That happens RO, come back stronger next season. We always love our MI ❣️❣️❣️??
— Vignesh VG (@VGVIGNESH1) April 25, 2022
अनेक दिग्गजांना अशा स्थितीतून जावं लागतं
आज मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने एक इमोशनल टि्वट केलं. त्यात त्याने या कठीण परिस्थितीतही साथ देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले. “या स्पर्धेत आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करु शकलेलो नाही. पण असं कधी कधी घडतं. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांना अशा स्थितीतून जावं लागतं. माझं मुंबई इंडियन्सवर आणि इथल्या वातावरणावर प्रेम आहे. आमच्या हिंतचितकांचे मी आभार मानतो. या परिस्थितीतही ते संघासोबत आहेत” असं रोहितने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. रोहितच्या या भावनिक टि्वटनंतर तो मुंबई इंडियन्सच कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. खरंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच या संघाने सर्वात मोठं यश मिळवलं आहे.
Mumbai jab 5 trophy jeeti tab bhi hum Mumbai ke sath they….. Or aaj Jab 8 match haar gyi is waqt ke bhi Mumbai ke sath hai……
? Forever
— Vedanshu Rawal (@Vedanshu1922) April 25, 2022
Make a strong come back in the remaining games All the best @ImRo45 @mipaltan
— Haresh kavad (@Hareshkavad4) April 25, 2022
वाईट स्वप्नासारखा सीजन
इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा आहे. पाचवेळचा चॅम्पियन संघ आतापर्यंत आठ सामने हरला आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची टीम तळाला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने आठ सामने गमावले आहेत. मुंबईच्या या दयनीय प्रदर्शनात फलंदाजी आणि गोलंदाजीचा मोठा रोल आहे. या दोन्ही आघाड्यांवर मुंबईचा संघ अपयशी ठरला आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणं, जवळपास अशक्यच आहे. पराभवानंतर कुठल्याही संघात गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. आता मुंबई इंडियन्सच्या संघातही हेच होताना दिसतय.