IPL : मुंबईने ज्याला संधीही दिली नाही त्याने आता लखनऊकडून डेब्यु करत केली कमाल

मुंबई इंडियन्सने ज्याला डेब्यु करण्याची संधी दिली नाही. त्याच खेळाडून आपल्या पहिल्या सामन्यात जोरदार कामगिरी करत सगळ्यांना धक्का दिला आहे.

IPL : मुंबईने ज्याला संधीही दिली नाही त्याने आता लखनऊकडून डेब्यु करत केली कमाल
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 4:09 PM

मुंबई : लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज ( LSG vs PBKS ) यांच्यात शनिवारी खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात पंजाबने 2 गडी राखून विजय मिळवला. पंजाब किंग्जसाठी सिकंदर रझाने महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीनंतर त्याने आपल्या फलंदाजीनेही धुमाकूळ घातला आणि पंजाबला सामना जिंकवून दिला. सिकंदरशिवाय लखनऊच्या एका खेळाडूनेही आपल्या चमकदार कामगिरीने नाव कमावले आहे. विशेष म्हणजे त्याचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. युवा वेगवान गोलंदाज युधवीर सिंग चरक ( yudhvir singh charak ) याने पहिल्याच सामन्यात कमाल केली आहे.

पहिल्याच सामन्यात मोठी कामगिरी

जम्मूचा युवा वेगवान गोलंदाज युधवीर सिंग चरक याला लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पण करण्याची संधी दिली. युधवीरने पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच षटकात त्याच्यावर दाखवलेला विश्वास योग्य असल्याचं दाखवून दिले. युधवीरने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर पंजाब किंग्जचा सलामीवीर टाइडला क्लीन बोल्ड केले. युधवीरने सामन्यात त्याच्या 3 ओव्हरमध्ये 6.33 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीने गोलंदाजी करत केवळ 19 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.

50 लाखांना विकत घेऊनही खेळवलं नाही

नेट बॉलर म्हणून युधवीर 2020 पासून आयपीएलचा भाग आहे. 2020 मध्ये तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर होता. IPL 2021 च्या लिलावात, त्याला मुंबईने 50 लाख रुपयांना विकत घेतले. त्याला मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नसली तरी 2022 च्या मेगा लिलावात 5 वेळा आयपीएल चॅम्पियनने त्याला सोडले. आता IPL 2023 च्या आयपीएल लिलावात एलएसजीने या खेळाडूला 20 लाख रुपयांना खरेदी केले. पण मुंबई इंडियन्सला त्याचा वापर करता आला नाही.

क्रिकेट करिअर

13 सप्टेंबर 1997 रोजी जन्मलेल्या युधवीर सिंग चरकने 2019-20 मध्ये हैदराबादसाठी देशांतर्गत पदार्पण केले. विशेष म्हणजे यानंतर तो जम्मू-काश्मीरकडून खेळू लागला. जर आपण युधवीरच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोललो, तर त्याने 4 प्रथम श्रेणी, 8 लिस्ट ए आणि 15 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 3, 8 आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.