IPL 2022 Auction: मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरवर 8 कोटी रुपये का उधळले? आकाश अंबानींनी दिलं उत्तर

Akash Ambani IPL 2022 Auction: मुंबई इंडियन्सने अशी बोली कशी लावली? त्यामागे मुंबईची काय रणनिती आहे? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

IPL 2022 Auction: मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरवर 8 कोटी रुपये का उधळले? आकाश अंबानींनी दिलं उत्तर
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 12:52 PM

मुंबई: दोन दिवस चाललेल्या TATA IPL Mega Auction 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने काल एक बोली लावली. त्याने सर्वांनाच चक्रावून टाकलं. मुंबई इंडियन्सने अशी बोली कशी लावली? त्यामागे मुंबईची काय रणनिती आहे? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai indians) फक्त बोली लावून थांबली नाही, तर त्यांनी तब्बल आठ कोटी रुपये मोजून त्या खेळाडूला विकतही घेतलं. हा खेळाडू आहे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर. (Jofra Archer) मुंबई इंडियन्सच्या या रणनितीमागे भविष्याचा विचार आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या सीजनमध्ये तो खेळणार नाहीय. आर्चरसाठी इतकी मोठी रक्कम मोजून त्याला विकत घेण्यामागे काय रणनिती आहे, त्याचा खुलासा संघ मालक आकाश अंबानी यांनी केला आहे. जोफ्रा आर्चरने फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर जसप्रीत बुमराहला एक मजबूत जोडीदार मिळणार आहे. आयपीएलचे पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने ऑक्शनच्या दुसऱ्यादिवशी आर्चरची खरेदी केली.

आम्ही सर्व गोष्टी लक्षात घेऊनचा निर्णय घेतला

“आम्ही सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजांची खरेदी झाली, त्यानंतर मार्की खेळाडूंच्या यादीत जोफ्रा हा एकमेव पर्याय उरला होता. आम्ही आधीच त्याच्या नावावर चर्चा केली होती. जोफ्रा आर्चर यावर्षी खेळणार नाही. पण जेव्हा कधी तो फिट होईल, तेव्हा बुमराहला एक मजबूत जोडीदार मिळेल हा मला विश्वास आहे” असं आकाश अंबानी म्हणाले.

आकाश अंबानीने टिम डेविडच सुद्धा कौतुक केलं. मुंबईने त्याच्यासाठी 8.25 कोटी रुपये खर्च केले. टिम डेविड मूळचा ऑस्ट्रेलियन आहे. हार्दिक पंड्या नसल्यामुळे त्याच्याजागी फिनिशर म्हणून मुंबईने डेविडला विकत घेतलं. “डेविड जगातील उत्तम फिनिशर्सपैकी एक आहे. आम्ही टिमवर मागच्या दोन-तीन वर्षांपासून लक्ष ठेवून होतो. मागच्यावर्षी RCB कडून खेळून त्याला चांगला अनुभव मिळाला आहे. आयपीएलमध्ये काय चालतं, कसा खेळ केला पाहिजे हे त्याला समजण आवश्यक होतं. त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. तो उत्तम फिनिशर्स पैकी एक आहे. हार्दिक आमच्या संघात नाहीय. त्यामुळे आम्हाला परदेशी खेळाडूला संघात घ्याव लागलं” असं आकाश अंबानीने सांगितलं.

जोफ्रा आर्चरची आयपीएलमध्ये दमदार कामगिरी

जोफ्रा आर्चरने आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये दमदार प्रदर्शन केलं होतं. त्याने 10 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. 2019 मध्ये आर्चरने 11 सामन्यात 11 विकेट घेतल्या. प्रतिषटक त्याचा इकॉनमी रेट 6.76 होता. 2014 मध्ये जोफ्रा आर्चरने 14 सामन्यात 20 विकेट घेतल्या. प्रति षटक त्याचा इकॉनमी रेट 6.55 होता. जोफ्रा आर्चरकडे टी 20 फॉर्मेटमधील 121 सामन्यांचा अनुभव आहे. त्याने एकूण 153 विकेट घेतल्या आहेत. 18 धावात चार विकेट हे त्याचे सर्वोत्तम गोलंदाजीचे आकडे आहेत. पावरप्लेशिवया हाणामारीच्या षटकांमध्येही तो चांगली गोलंदाजी करतो. जोफ्रा आर्चरचे हेच आकडे बघून मुंबई इंडियन्सने यंदाच्या सीजनमध्ये खेळणार नसला, तरी त्याला आठ कोटी रुपयांना विकत घेतलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.