Rohit sharma IPL 2023 : Mumbai Indians कशी जिंकणार? फक्त एकदा रोहितच्या Average वर मारा नजर
Rohit sharma IPL 2023 : रोहित शर्माच्या आयपीएल करियरबद्दल बोलायच झाल्यास तो आतापर्यंत 234 सामने खेळलाय. यात 6060 धावा केल्यात. रोहितचा सर्वाधिक स्कोर 109 आहे.
मुंबई : मुंबई इंडियन्स आयपीएलमधील एक यशस्वी टीम असून त्यांचा कॅप्टन आहे रोहित शर्मा. रोहितच्या नेतृत्वाखाली पाचवेळा मुंबई इंडियन्सने आयपीएलच विजेतेपद मिळवलय. यंदाच्या सीजनमध्ये रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स दोघेही संघर्ष करताना दिसतायत. रोहित शर्माच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत नाहीय. त्यामुळे तमाम क्रिकेट पंडित रोहित शर्माची बॅट कधी तळपणार? असा प्रश्न विचारतायत.
काहींनी रोहित शर्माच करियर आता उतरणीला लागलय. त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, असं आधीच ठरवून टाकलय. रोहित शर्माचा Average ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे. मागच्या 6 आयपीएल सीजनपासून रोहित शर्माचा Average हा 30 च्या खाली आहे.
या सीजनमध्ये रोहितचा सर्वाधिक स्कोर काय?
रोहित शर्माचा Average खाली असला, तरी त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा विजेतेपद मिळवलय. रोहित शर्माने चालू सीजनमध्ये 7 सामन्यात 181 धावा केल्यात. त्याचा Average 25.86 चा आहे. रोहितचा सर्वाधिक स्कोर 65 आहे. 11 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. दिल्ली या सीजनमधील सर्वात कमकुवत संघ आहे.
रोहितने सर्वाधिक धावा कुठल्या सीजनमध्ये केल्या?
रोहित शर्माच्या आयपीएल करियरबद्दल बोलायच झाल्यास तो आतापर्यंत 234 सामने खेळलाय. यात 6060 धावा केल्यात. रोहितचा सर्वाधिक स्कोर 109 आहे. त्याचा Average 30.15 आहे. या संपूर्ण करियरमध्ये ही सरासरी मेंटेन केलीय. थोडं मागे जाऊया. 2016 च्या सीजनमध्ये रोहितने 14 सामन्यात 489 धावा केल्या. रोहितचा बॅटिंग Average 44.45 चा आहे. रोहितच्या आयपीएल करियरमधील सर्व सीजनमधील हा जास्त Average आहे.
वर्ष | सामने | धावा | सरासरी |
---|---|---|---|
2017 | 17 | 333 | 23.78 |
2018 | 14 | 286 | 23.83 |
2019 | 15 | 405 | 28.92 |
2020 | 12 | 332 | 27.66 |
2021 | 13 | 381 | 29.30 |
2022 | 14 | 268 | 19.14 |