Mumbai Indians च्या Murugan Ashwin ने टिम सायफर्टची दांडी उडवली तो अप्रतिम गुगली चेंडू एकदा पहाच VIDEO

Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2022 स्पर्धेत काल मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) आपला पहिला सामना खेळले.

Mumbai Indians च्या Murugan Ashwin ने टिम सायफर्टची दांडी उडवली तो अप्रतिम गुगली चेंडू एकदा पहाच VIDEO
मुरुगन अश्विन मुंबई इंडियन्स Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 11:56 AM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 स्पर्धेत काल मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) आपला पहिला सामना खेळले. दिल्लीने या सामन्यात मुंबईवर चार गडी राखून आरामात विजय मिळवला. खरंतर मुंबईने जिंकायचा सामना हरला, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. ललित यादव (Lalit Yadav) आणि अक्षर पटेल (Akshar patel) या दोघांनी अक्षरक्ष: विजय खेचून नेला. या दोघांनी तुफान फटेकबाजी केली. 30 चेंडूतील त्यांच्या नाबाद 75 धावांच्या भागीदारीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने हा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीला विकेट्स मिळवल्या. पण त्यांना दिशा आणि टप्पा यावर नियंत्रण राखता आलं नाही, ज्याचा दिल्लीच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. ललित आणि अक्षरने अखेरच्या पाच-सहा ओव्हरर्समध्ये फटकेबाजी केली, असली तरी दिल्लीच्या फलंदाजांनी आधीपासूनच धावफलक हलता ठेवला होता. ज्याचा त्यांना फायदा झाला.

फक्त कुलदीप यावदला आदर दिला

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. इशान किशनने मुंबईकडून काल धमाकेदार खेळी केली. त्याने 48 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. कॅप्टन रोहित शर्मा (41) आणि डेब्यू करणाऱ्या तिलक वर्मानेही (22) आपली चुणूक दाखवून दिली. बॅटिंग करताना मुंबईच्या फलंदाजांनी कुलदीप यादव वगळता दिल्लीच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. अत्यंत सहजतेने धावा वसूल केल्या.

सायफर्टला रोखणं आवश्यक होतं

दरम्यान मुंबईची बॉलिंग काल निष्प्रभ वाटली असली, तरी फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विनने चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या दोन विकेट झटपट काढून दिल्ली कॅपिटल्सला बॅकफूटवर ढकललं होतं. त्याने आपल्या अप्रतिम गुगलीवर टिम सायफर्टचा महत्त्वाचा विकेट मिळवला. सायफर्टने आक्रमक सुरुवात केली. तो चौफेर फटकेबाजी करत होता. त्याला रोखणं आवश्यर होतं.

ऋषभ पंतवर दबाव आला

अखेर मुरुगन अश्विनने आपल्या गुगलीच्या जाळ्यात त्याला अडकवलं. अश्विनच्या चेंडूवर सायफर्टने कव्हर्समध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू खाली राहिला आणि थेट मिडल स्टम्पचा उडवला. त्यानंतर त्याच षटकात त्याने मनदीप सिंगला भोपळाही फोडू दिला नाही. फुलटॉस चेंडूवर मनदीपने तिलक वर्माकडे सोपा झेल देऊन तंबूची वाट धरली. मुरुगन अश्विनने चार षटकात चौदा धावा देत दोन विकेट काढल्या. या दोन विकेटसमुळे कॅप्टन ऋषभ पंतवरही दबाव आला. तायमल मिल्सने त्याला अवघ्या एक रन्सवर आऊट केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.