रोहित शर्मासोबत खेळता खेळता बनला ‘हिटमॅन’,’या’ डावखुऱ्या फलंदाजाने 10 चेंडूतच संपवला सामना

रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर असणाऱ्या या खेळाडूने तुफान खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या 10 चेंडूत विजयासाठी आवश्यक धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

रोहित शर्मासोबत खेळता खेळता बनला ‘हिटमॅन’,'या' डावखुऱ्या फलंदाजाने 10 चेंडूतच संपवला सामना
क्विंटन डिकॉक
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 11:30 AM

लंडन : अगदी पूर्वीपासून एक म्हण आहे, संगतीचा परिणाम हा होतोच. म्हणजेच ज्या लोकांसोबत आपण राहतो, त्याच्यांतले गुण आपल्या आपोआपच येतात. असंच काहीसं झालंय वर्ल्ड क्रिकेटमधील खरा हिटमॅन असणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याच्या मुंबई इंडियन्समधील तगडा साथीदार क्विंटन डिकॉकसोबत (Quinton de kock). आपल्या तुफान फलंदाजीने सामना पलटवणाऱ्या रोहितप्रमाणेच डीकॉक देखील धडाकेबाज फलंदाजी करत दुसरा हिटमॅन बनत आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या 100 चेंडूच्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) या टूर्नामेंटमध्ये डीकॉकने अवघ्या 10 चेंडूत संघाला विजय मिळवून दिला.

इंडियन प्रिमियर लीग (IPL) स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणारी रोहित आणि डीकॉक ही जोडी एक उत्तम सलामीवीरांची जोडी आहे. दोघेही तुफान फटकेबाजीसाठी ओळखले जातात. मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असणारा डीकॉक मुंबई इंडियन्समधील खेळीमुळे भारतातही चांगलाच प्रसिद्ध आहे. दरम्यान रोहित शर्मासोबत खेळून आता डीकॉकही त्याच्या प्रमाणेच धमाकेदार फलंदाजी करु लागल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

‘द हंड्रेड’ मध्ये संघाला मिळवून दिला विजय

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये नॉर्दन सुपरचार्जर्स आणि साउदर्न ब्रेव या दोन संघात सामना सुरु होता. यावेळी सुपरचार्जर्सनी प्रथम फलंदाजी करत 100 चेंडूत 6 विकेट्सच्या बदल्यात 128 रन केले. त्यानंतर साउदर्न ब्रेव संघाकडून 129 धावांच टार्गेट 5 चेंडू ठेवून 95 चेंडूत 5 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण करण्यात आलं. ज्यात सिंहाचा वाटा ठरला तो डीकॉकचाच.

डीकॉकसमोर प्रतिस्पर्धी नतमस्तक

साउदर्न ब्रेवने मिळवलेल्या या विजयात खरा हिरो ठरला तो क्विंटन डिकॉक. सलामीला येत त्याने 45 चेंडूंत नाबाद 72 धावा केल्या. ज्यात 9 चौकारांसह 1 षटकारही होता. विशेष म्हणजे यातील विजयासाठी आवश्यक 42 रन्स हे त्याने केवळ 10 चेंडूत केले. डिकॉकला या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

इतर बातम्या

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

एबी डिव्हिलियर्सवर रबाडाबरोबर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप, खुद्द एबीडीचं स्पष्टीकरण, म्हणतो…

IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO

(Mumbai Indians opener Quinton de kock shine in the hundred Tounrament with marvelous knock)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.