Rohit Sharma : पडद्यामागे काही घडतय का? MI चे मालक आकाश अंबानी-रोहितचा एकाच गाडीतून प्रवास, VIDEO

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत सध्या बरच काही घडतय. सोशल मीडियावर सध्या याच टीमची चर्चा आहे. परफॉर्मन्सपेक्षा पण या टीमच्या अन्य बाबींबद्दल बरच काही बोलल जातय. आता टीमचे मालक आकाश अंबानी आणि रोहित शर्मा यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे आता यावरुनही बरेच तर्क-वितर्क, कयास लावले जातील. मुंबई इंडियन्ससाठी यापुढचा प्रत्येक सामना तितकाच महत्त्वाचा आहे.

Rohit Sharma : पडद्यामागे काही घडतय का? MI चे मालक आकाश अंबानी-रोहितचा एकाच गाडीतून प्रवास, VIDEO
Rohit Sharma Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 9:09 AM

मुंबई इंडियन्सचे सहमालक आकाश अंबानी आणि टीमचा माजी कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. रोहित शर्मा आकाश अंबानी यांच्या कारमधून वानखेडेवर आला. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध होणार आहे. आकाश अंबानी आणि रोहित शर्मा यांच्या एकत्र येण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्मा आकाश अंबानी यांच्या आलिशान कारच्या फ्रंट सीटवर बसला होता. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये परिवर्तन झालय. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला टीमच कॅप्टन बनवलय. त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झालाय. मुंबई इंडियन्ससाठी IPL 2024 च्या सीजनची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. पहिले तिन्ही सामने टीमने गमावले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एकमेव विजय मिळवला.

या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या नेतृत्व बदलाचीच चर्चा आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला हटवलं. त्याच्याजागी मागच्या दोन सीजनमध्ये गुजरात टायटन्सच यशस्वी नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवली. पण सलग तीन पराभवांमुळे हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिकच्या विरोधात हूटिंग केलं. तेच रोहित शर्माच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीचा हा निर्णय फॅन्सना पटलेला नाही. त्याचे पडसाद स्टेडियममध्ये उमटताना दिसतात.

रोहित शर्माचा या सीजनमध्ये परफॉर्मन्स कसा आहे?

रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांच्या एकत्र प्रवासाच्या व्हिडिओमुळे आता नवीन शक्यतांच्या चर्चांना उधाण येईल. मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा बद्दल बरच काही बोलल जातय. रोहित पुढच्या सीजनमध्ये मुंबईकडून खेळणार नाही, असं सुद्धा बोलल जातय. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभव झाल्यानंतर सुद्धा रोहित शर्मा आणि आकाश अंबानी मैदानात चर्चा करताना दिसले होते. त्या फोटोने सगळ्यांचच लक्ष वेधलेलं.

प्रचंड ट्रोलिंगचा सामना

रोहितने या सीजनमध्ये अजून एकही हाफ सेंच्युरी झळकवलेली नाही. रोहितने चार सामन्यात 118 धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्याने या सीजनमध्ये प्रचंड ट्रोलिंगचा सामना केलाय. मुंबई इंडियन्सची टीम मागच्या तीन सीजनपासून संघर्ष करत आहे. आयपीएलमधील हा एक यशस्वी संघ आहे. सर्वाधिक पाचवेळा त्यांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.