VIDEO: मुंबई इंडियन्सचे दमदार शिलेदार, जीममध्ये सरावात व्यस्त, अर्जून तेंडूलकरचा फिटनेस पाहाच!

IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांना युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार असून सध्या दोन्ही संघ युएईत पोहोचले आहेत.

VIDEO: मुंबई इंडियन्सचे दमदार शिलेदार, जीममध्ये सरावात व्यस्त, अर्जून तेंडूलकरचा फिटनेस पाहाच!
अर्जून तेंडुलकर
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 11:34 AM

दुबई : कोरोनाच्या संकटामुळे उर्वरीत आयपीएल (IPL 2021) ही युएई (UAE) होणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी सर्व संघ  युएईला पोहोचले आहेत. चेन्नई सुपरकिंग्सनंतर (CSK) सर्वात आधी  मुंबई इंडियन्सचा संघ युएईला पोहोचला होता. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपताच कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) युएईला पोहोचला आहे. आता सर्व खेळाडूंचा विलगीकरणाचा कालावधी संपला असून सर्व संघांने सरावाला सुरुवात केली आहे.

नुकताच मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू जीममध्ये सराव करताना दिसत आहेत. यामध्ये इशान किशन, राहुल चहर, धवल कुलकर्णी, जयंत यादवसह पियुष चावला हे सारे दिसत आहे. पण यामध्ये युवा खेळाडू आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून मात्र उठून दिसत आहे. 6 फुटांच्या आसपास उंच असणाऱ्या अर्जूनचा फिटनेस पाहून मुंबईचे चाहते प्रभावित झाले आहेत. या व्हिडीओला मागे बेजुबान हे धांसू गाणंही लावलं आहे.

आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स सज्ज

सर्वात यशस्वी आयपीएल संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सने यंदाही स्पर्धा जिंकण्याच्या दृष्टीने सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आतावपर्यंत झालेल्या आयपीएलमधील 29 सामन्यांपैकी 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 4 सामने जिंकले आहेत. पण हे चारही सामने अत्यंत दमदार पद्धतीने जिंकल्याने यंदाही आयपीएल ट्रॉफीचे प्रबळ दावेदार म्हणून मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिलं जात आहे.

इतर बातम्या

IPL 2021 सुरु होण्यापूर्वी पोलार्डचा जलवा, 22 चेंडूत संपवला 20 षटकांचा सामना, 232 चा स्ट्राईक रेट

IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने? पाहा एका क्लिकवर

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

(Mumbai indians players in gym video posted by MI see arjun tendulkar fitness)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.