IPL 2024 | Mumbai Indians च्या फॅन्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी, ‘हा’ खेळाडू किती सामन्यांना मुकणार?

IPL 2024 | यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची टीम नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा आयपीएल सीजन खास आहे. पण सीजन सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या फॅन्सच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलीय. प्रमुख आधारस्तंभच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

IPL 2024 | Mumbai Indians च्या फॅन्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी, 'हा' खेळाडू किती सामन्यांना मुकणार?
mumbai indians
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 10:37 AM

IPL 2024 | मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा आयपीएल सीजन खास आहे. कारण मुंबई इंडियन्सची टीम नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. मागची अनेक वर्ष रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच कर्णधारपद भूषवलं. त्याच्या नेतृत्वाखाली तब्बल पाचवेळा मुंबई इंडियन्सने आयपीएलच जेतेपद पटकावलं. पण मागच्या दोन सीजनमध्ये या यशस्वी टीमला संघर्ष करावा लागला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याची नियुक्ती केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने एकदा जेतेपद मिळवलं, तर एकदा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची टीम नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.

आयपीएल 2024 चा सीजन सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसू शकतो. मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभच सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव सध्या प्रॅक्टिस करतोय. त्याचं चांगलं रिहॅब सुरु आहे. सोशल मीडियावर सुद्धा तो एक्टिव आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. आपल्या इन्स्टा स्टोरीमधून सहकाऱ्यांच मनोबल टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ ठीक आहे, मग समस्या काय? असा प्रश्न निर्माण होतो.

मग, त्याच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स का?

IPL 2024 मध्ये सूर्यकुमारच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याबद्दल सस्पेंस का आहे? मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या सामन्यांना तो मुकू शकतो, असं का म्हटलं जातय? असं यासाठी कारण त्याला NCA कडून अजून फिटनेस प्रमाणपत्र मिळालेलं नाहीय

…म्हणून त्याच्या खेळण्याची शक्यता कमी

IPL 2024 सीजनची सुरुवात 22 मार्चपासून होत आहे. मुंबई इंडियन्स आपलं अभियान 24 मार्च म्हणजे रविवारपासून गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्याने सुरु करणार आहे. पण T20 मधील टॉप फलंदाज या सामन्यात खेळणार का? हा प्रश्न आहे. रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. पहिलाच नाही, तर दुसऱ्या सामन्यात देखील त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. कारण त्याच्या फिटनेसबद्दल साशंकता आहे. सूर्यकुमार यादवच हर्णियाच ऑपरेशन झालय. सध्या तो रिहॅबच्या प्रोसेसमध्ये आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.