VIDEO : 6,6,6,6, Mumbai Indians च्या स्टार बॅट्समनने पाकिस्तानी गोलंदाजाच्या उडवल्या चिंधडया

PSL 2023 : टिम डेविडने सगळ्यांचच मन जिंकलं. पाकिस्तान सुपर लीगच्या 8 व्या सीजनमध्ये टिम डेविड पहिलाच सामना खेळत होता. एका ओव्हरमध्ये इतकं धुतलं की बॉलिंग विसरेल. एकदम लांब, लांब SIX मारले

VIDEO : 6,6,6,6, Mumbai Indians च्या स्टार बॅट्समनने पाकिस्तानी गोलंदाजाच्या उडवल्या चिंधडया
Tim davidImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 11:52 AM

लाहोर : PSL 2023 मध्ये मुल्तान सुल्तांसची टीम भले मॅच हरली असेल, पण त्यांचा एक बॅट्समन टिम डेविडने सगळ्यांचच मन जिंकलं. पाकिस्तान सुपर लीगच्या 8 व्या सीजनमध्ये टिम डेविड पहिलाच सामना खेळत होता. त्याने इस्लामाबाद युनायटेडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. टिम डेविडने 27 चेंडूत 60 धावा चोपल्या. यात 5 सिक्स आणि 4 फोर होते. टिम डेविडच्या बॅटिंगच्या बळावर मुल्तान सुल्तांसची टीम 205 धावांपर्यंत पोहोचली. इस्लामाबाद युनायटेडच्या टीमने एक चेंडू राखून विजयी लक्ष्य गाठलं.

पाकिस्तानी गोलंदाजावर हल्लाबोल

टिम डेविड बद्दल बोलायच झाल्यास त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज रुमान रईसची वाट लावून टाकली. रुमानच्या एका ओव्हरमध्ये टिम डेविडने सलग चार सिक्स मारले. या ओव्हरमध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 30 धावा दिल्या. या ओव्हरमध्ये रुमानच्या गोलंदाजीवर मुल्तान सुल्तांसच्या फलंदाजांनी 4 सिक्स आणि एक फोर मारला.

WPL 2023 Points Table : हरमनप्रीत कौरची मुंबई कुठल्या स्थानावर? अन्य टीम्सची काय आहे स्थिती?

16 व्या ओव्हरमध्ये रुमानची धुलाई

रुमान रईसने आपल्या दोन ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर इस्लामाबादचा कॅप्टन शादाबने त्याच्याहाती चेंडू सोपवला. पण हा डाव उलटा पडला. रुमानचा पहिला चेंडू वाइड होता. त्यानंतर शान मसूदने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. स्ट्राइकवर टिम डेविड आला. त्याने कमालीचे शॉट्स मारले. रुमान रईसच्या चार चेंडूंवर सलग 4 सिक्स मारले. टिम डेविडच्या हिटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

टिम डेविडच तुफान

टिम डेविडने फक्त 20 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. पाकिस्तान सुपर लीगच्या या सीजनमधील हे वेगवान अर्धशतक आहे. टिम डेविडचा पीएसएलमधील रेकॉर्ड कमालीचा आहे. टिम डेविडने या लीगमध्ये 18 इनिंगमध्ये 43.16 च्या सरासरीने 518 धावा फटकावल्या आहेत. टिम डेविडचा स्ट्राइक रेट 186 चा आहे. टिम डेविड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मागचा सीजन त्याने गाजवला होता. आता पीएसएलमधील त्याच्या परफॉर्मन्समुवळे मुंबई इंडियन्सची टीम निश्चित आनंदात असेल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.