Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्याचा 1 नंबर शॉट, क्रिकेटचा देवही पडला प्रेमात, VIDEO पहाल, तर WOW पहिली प्रतिक्रिया

Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्यकुमार यादवच क्रिकेटमध्ये असे नवीन शॉट बनवू शकतो. मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवने मारलेल्या या सिक्सची सर्वत्र चर्चा आहे. सूर्याची कालची खेळी खूप स्पेशल होती.

Suryakumar Yadav IPL 2023 : सूर्याचा 1 नंबर शॉट, क्रिकेटचा देवही पडला प्रेमात, VIDEO पहाल, तर WOW पहिली प्रतिक्रिया
Suryakumar yadacv ipl 2023Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 8:29 AM

मुंबई : IPL 2023 स्पर्धेत सूर्यकुमार यादव तुफान फॉर्ममध्ये आलाय. मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनने शुक्रवारी आक्रमक फलंदाजीच प्रदर्शन केलं. त्याने आयपीएल करियरमधील पहिलं शतक झळकावलं. वानखेडे स्टेडियमवर काल गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. आयपीएलमधला हा 57 वा सामना होता.

सूर्याने 20 व्या ओव्हरच्या लास्ट बॉलवर सिक्स मारुन आपली सेंच्युरी पूर्ण केली. सूर्यकुमार यादवने त्याच्या इनिंग दरम्यान मारलेल्या एका सिक्सवर मुंबईचा मेंटॉर सचिन तेंडुलकरही खूप प्रभावित झाला.

कॉपी करण्यापासून सचिनही स्वत:ला रोखू शकला नाही

सूर्यकुमार यादवची इनिंग इतकी जबरदस्त होती की, त्याचं कौतुक कारव तेवढं कमी आहे. सूर्यकुमार यादवने काल गुजरात विरुद्ध मैदानात असा एक शॉट मारला, ज्याच अनेकांना आश्चर्य वाटतय. खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही सूर्याच्या या शॉटच्या प्रेमात पडला. सचिनही त्या शॉटची कॉपी करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

शमीच्या बॉलिंगवर ‘तो’ सिक्स

सूर्यकुमार यादवने गुजरातचा यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर सिक्स मारला. 18 वी ओव्हर टाकणाऱ्या शमीने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर बहुतेक फलंदाज ड्राइव्हचा फटका मारतात. पण सूर्यकुमारने या चेंडूवर हवाई शॉट मारला. त्याने चेंडू बॅटने मिडल केला व थर्डमॅनला जाईल अशा पद्धतीने सिक्स मारला. कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी सुद्धा या शॉटच कौतुक केलं. सचिनही या शॉटवर खूप प्रभावित झाला. तो ड्रेसिंग रुममध्ये या शॉटची कॉपी करताना दिसला.

वानखेडेवर MI कडून कोणी-कोणी सेंच्युरी झळकवलीय?

वानखेडे स्टेडियमवर 2011 नंतर मुंबई इंडियन्सकडून झळकवण्यात आलेलं हे पहिलं शतक आहे. सूर्यकुमारच्या आधी सचिन तेंडुलकरने वानखेडेवर मुंबई इंडियन्ससाठी सेंच्युरी झळकवली होती. सचिनच ते एकमेव आयपीएल शतक आहे. सचिनने कोच्ची टस्कर्सच्या टीम विरोधात हे शतक झळकवल होतं. सचिनच्या आधी सनथ जयसूर्याने मुंबई इंडियन्ससाठी वानखेडेवर शतक झळकवल होतं. त्याने 2008 साली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ही शतकी खेळी केली होती. जयसूर्याने मुंबईसाठी आयपीएलमध्ये पहिलं शतक झळकवल होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.