MI vs RR IPL 2023 : Rohit Sharma आजच्या मॅचमध्ये खेळणार नाही का? मुंबईच्या हेड कोचने काय म्हटलं?
MI vs RR IPL 2023 : रोहित शर्मा आजच्या आणि पुढच्या काही सामन्यांमध्ये खेळेल की, नाही, अशी चर्चा का सुरु आहे? मुंबई इंडियन्सचा आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना असून मुंबई इंडियन्सला विजय आवश्यक आहे.
मुंबई : मुंबई इंडियन्सचा आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना होणार आहे. मुंबईसाठी ही मॅच महत्वाची आहे. कारण मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सने पराभव केला होता. त्याआधी पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केले. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची टीम आतापर्यंत सात मॅच खेळली आहे. यात त्यांनी तीन विजय मिळवलेत. चार सामन्यात पराभव झालाय.
मुंबई इंडियन्ससाठी या सीजनची निराशाजनक सुरुवात झाली. पहिले दोन सामने त्यांनी गमावले. नंतर सलग तीन सामने जिंकले. पुन्हा दोन सामने गमावले.
पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम कितव्या स्थानावर?
प्लेऑफची आशा जिवंत ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सला यापुढच्या सगळ्या सामन्यात विजय आवश्यक आहे. आज बलाढ्य राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना होणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सची टीम दुसऱ्या स्थानावर आहे. विजय मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सला लौकीकाला साजेसा खेळ दाखवावा लागेल.
रोहित शर्माला विश्रांती देणार का?
आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला विश्रांती देणार का? या मुद्यावर मुंबई इंडियन्सचे हेड कोच मार्क बाऊचर यांनी महत्वाच विधान केलय. “रोहित शर्माने चालू सीजनमध्ये विश्रांती मागितलेली नाही. त्याने अशी मागणी केली, तर नक्कीच विचार करु” असं बाऊचर म्हणाले.
सुनील गावस्करांनी काय सल्ला दिलाय?
रोहित शर्मा मागच्या काही महिन्यापासून सातत्याने क्रिकेट खेळतोय. टीम इंडियाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी, रोहित शर्माने काही सामन्यांसाठी विश्रांती घेतली पाहिजे, असा सल्ला दिला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यासाठीचा फिटनेस लक्षात घेता सुनील गावस्करांनी हा सल्ला दिला होता. लंडनच्या ओव्हल मैदानात 7 ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे.
रोहितच्या खेळण्यासंदर्भात मुंबईचे हेड कोच काय म्हणाले?
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समधील सामन्याच्या पूर्वसंध्येला मार्क बाऊचर म्हणाले की, “रोहितने आराम करावा, असं मला वाटत नाही. यावर निर्णय घेणं हे माझ काम नाही. रोहित एक चांगला खेळाडू आणि कॅप्टन आहे. त्यामुळे त्याने खेळत रहावं, असं आम्हाला वाटतं. रोहितने माझ्याजवळ येऊन त्याला विश्रांती घ्यायची आहे, असं सांगितलं, तर आम्ही विचार करु. अजून त्याने अशी काही मागणी केलेली नाही. त्यामुळे तो खेळत राहिलं”