MI vs RR Live Score, IPL 2022: गुढीपाडव्याला पलटनचा सलग दुसरा पराभव, राजस्थानचा ‘रॉयल’ विजय
MI vs RR Live Score live score in marathi: मुंबई इंडियन्सचा मागच्या सामन्यात पराभव झाला होता, तर राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला होता.
मुंबई: आयपीएल 2022 स्पर्धेत (IPL 2022) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सलग दुसरा पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मुंबईचा 23 धावांनी पराभव केला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने निर्धारीत 20 षटकात आठ बाद 170 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 61 धावा केल्या. इशान शर्माने आज पुन्हा एकदा 54 धावांची खेळी केली.
Key Events
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये दाखल झाला असला, तरी तो आजच्या सामन्यात खेळत नाहीय.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध संजू सॅमसनने जबरदस्त फलंदाजी केली होती. आजच्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच फलंदाजीची अपेक्षा आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
गुढीपाडव्याला पलटनचा सलग दुसरा पराभव, राजस्थानचा ‘रॉयल’ विजय
आयपीएल 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबईचा 23 धावांनी पराभव केला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने निर्धारीत 20 षटकात आठ बाद 170 धावा केल्या.
-
चहलचा डबल स्ट्राइक, पलटनचा डाव अडचणीत
टिम डेविड आणि डॅनियल सॅम्स हे स्वस्तात तंबूत परतले आहेत. या दोन्ही विकेट चहलने काढल्या. डेविड एक रन्सवर तर सॅम्सला भोपळाही फोडू दिला नाही. मुंबईच्या सहा बाद 136 धावा झाल्या आहेत.
-
-
तिलक वर्मा बाद
रविचंद्रन अश्विनला तिलक वर्माने रिव्हर्स स्विप SIX मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अश्विनने तिलक वर्माला आऊट केलं. त्याने 61 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या चार बाद 161 धावा झाल्या आहेत.
-
तिलक वर्माने अर्धशतक झळकावलं
तिलक वर्माने अर्धशतक झळकावलं आहे. त्याने 28 चेंडूत 50 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि चार षटकार होता. मुंबई इंडियन्सच्या तीन बाद 122 धावा झाल्या आहेत.
मानला तुला TILAK!?
Gets a brilliant 5⃣0⃣ to his name ?
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2022
-
हाफ सेंच्युरीनंतर इशान किशन OUT
हाफ सेंच्युरी झळकावल्यानंतर इशान किशन 54 धावांवर आऊट झाला. ट्रेंट बोल्टला फटकावताना नवदीप सैनीने सुंदर झेल घेतला. इशानने 43 चेंडूत 54 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता.
-
-
11 षटकात मुंबईच्या 100 धावा पूर्ण
11 षटकात मुंबईच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. इशान किशन 44 आणि तिलक वर्मा 40 धावांवर खेळतोय.
-
तिलक वर्माचा युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
10 षटकात मुंबईच्या दोन बाद 94 धावा झाल्या आहेत. तिलक वर्माने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला.
-
पलटनच्या युवा खेळाडूंची जबरदस्त फलंदाजी
पलटनच्या युवा खेळाडूंची जबरदस्त फलंदाजी सुरु आहे. नऊ षटकात मुंबईच्या दोन बाद 82 धावा झाल्या आहेत. इशान किशन 39 तिलक वर्मा 26 धावांवर खेळतोय.
Right into the gap, shot re Tilak ?
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2022
-
तिलक वर्माचा अश्विनच्या गोलंदाजीवर ‘कडक’ फ्लॅट सिक्स
सात षटकात मुंबई इंडियन्सच्या दोन बाद 61 धावा झाल्या आहेत. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने सुंदर षटकार खेचला. इशान किशन 34 आणि तिलक वर्मा 10 धावांवर खेळतोय.
-
तिलक वर्माने सुंदर षटकार खेचला
सात षटकात मुंबई इंडियन्सच्या दोन बाद 61 धावा झाल्या आहेत. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने सुंदर षटकार खेचला. इशान किशन 34 आणि तिलक वर्मा 10 धावांवर खेळतोय
-
मुंबई इंडियन्सला दुसरा झटका
चार षटकात मुंबई इंडियन्सच्या दोन बाद 40 धावा झाल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर 10 धावांवर माघारी परतला. अनमोलप्रीत सिंह नवदीप सैनीच्या षटकातली शेवटच्या चेंडूवर पडिक्कलकडे सोपा झेल दिला. इशान किशन खेळपट्टीवर आहे.
NaWdeep. ?
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 2, 2022
-
शेवटच्या दोन षटकात चांगली गोलंदाजी
राजस्थान रॉयल्सने निर्धारीत 20 षटकात आठ बाद 193 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य आहे. टायमल मिल्स आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी शेवटच्या दोन षटकात जास्त धावा ने दता चांगली गोलंदाजी केली.
-
जोस बटलर आऊट
100 धावांवर खेळणाऱ्या जोस बटलरला जसप्रीत बुमराहने सुंदर यॉर्कर चेंडूवर क्लीन बोल्ड केलं. त्याआधी शिमरॉन हेटमायरला 35 धावांवर तिलक वर्माकरवी झेलबाद केलं. रविचंद्रन अश्विनही एक रन्सवर रनआऊट झाला आहे. 19 षटकात राजस्थानच्या सहा बाद 185 धावा झाल्या आहेत.
-
जोस बटलरची शानदार सेंच्युरी
जोस बटरलरने मुंबई इंडियन्स विरुद्ध शानदार शतक झळकावलं आहे. त्याने 66 चेंडूत 100 धावा केल्या. यात 11 चौकार आणि पाच षटकार आहेत.
100 reasons why Jos is the ???? ??#RoyalsFamily | #HallaBol | #IPL2022 | #MIvRR
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 2, 2022
-
राजस्थानच्या तीन बाद 182 धावा
18 षटकात राजस्थानच्या तीन बाद 182 धावा झाल्या आहेत. जोस बटलर शतकापासून एक रन्स दूर आहे.
-
धोकादायक संजू सॅमसन OUT, कायरन पोलार्डने काढली विकेट
आक्रमक फलंदाजी करणारा धोकादायक संजू सॅमसन OUT झाला आहे. कायरन पोलार्डने त्याला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. 14.2 षटकात राजस्थानच्या तीन बाद 130 धावा झाल्या आहेत.
-
संजू सॅमसनचा कव्हर्समध्ये सुंदर षटकार
डॅनियल सॅम्सच्या वेगवान गोलंदाजीवर संजू सॅमसनने कव्हर्समध्ये सुंदर षटकार खेचला. राजस्थानच्या 12 षटकात दोन बाद 115 धावा झाल्या आहेत.
-
बटलर-संजूची आक्रमक फलंदाजी, मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई
राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर आणि संजू सॅमसनची आक्रमक फलंदाजी सुरु आहे. राजस्थानने 100 धावांचा टप्पा पार केला आहे. 11 षटकात राजस्थान रॉयल्सच्या दोन बाद 108 धावा झाल्या आहेत. बटलर 76 आणि संजू 21 धावांवर खेळतोय. मुरुगन अश्विनच्या षटकात 19 धावा वसूल केल्या.
-
बटलर-संजूची जोडी मैदानात
नऊ षटकात राजस्थान रॉयल्सच्या दोन बाद 73 धावा झाल्या आहेत. बटलर नाबाद 57 आणि सॅमसन सात रन्सवर खेळतो..
-
जोस बटलरची हाफ सेंच्युरी
जोस बटलरने शानदार हाफ सेंच्युरी झळकवली आहे. 33 चेंडूत त्याच्या 52 धावा झाल्या आहेत. यात पाच चौकार आणि चार षटकार आहेत.
https://t.co/U2gLgPMgTU pic.twitter.com/06BOgd5Ndp
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 2, 2022
-
जोस बटलर- कॅप्टन संजू सॅमसन मैदानात
सात षटकात राजस्थानच्या दोन बाद 55 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 42 आणि कॅप्टन संजू सॅमसन 5 धावांवर खेळतोय..
-
राजस्थान रॉयल्सची मोठी विकेट
पावरप्लेच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सची मोठी विकेट मिळाली आहे. देवदत्त पडिक्कलने टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माकडे सोपा झेल दिला. देवदत्तने 7 धावा केल्या. राजस्थानच्या दोन बाद 48 धावा झाल्या आहेत.
Tymal ends the powerplay with a BANG! ?
Padikkal dug in on a short one but completely mistimed it & Ro completed a simple catch.
Follow all the updates on our LIVE blog ? https://t.co/80uc8Ja7Ms
RR: 48/2 (6)#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #MIvRR #TATAIPL https://t.co/jpHmTPKekh
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2022
-
मुरुगन अश्विनचं चांगलं षटक
पाच षटकात राजस्थानच्या एक बाद 47 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 39 आणि देवदत्त पडिक्कल 7 धावांवर खेळतोय. बटलरने तीन चौकार आणि चार षटकार लगावले आहेत.
-
थम्पीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल
बसिल थम्पीच्या पहिल्या षटकात जोस बटलरने हल्लाबोल केला. थम्पीच्या ओव्हरमध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांसह 26 धावा वसूल केल्या.
-
बुम बुम बुमराह, राजस्थानला दिला पहिला झटका
मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला पहिला झटका दिला आहे. जसप्रीत बुमराहने यशस्वी जैस्वालला टिम डेविडकरवी झेलबाद केले. यशस्वी एक रन्सवर आऊट झाला. राजस्थानच्या एक बाद 17 धावा झाल्या आहेत.
WICKET geli! ?
Jaiswal departs after hitting it straight to David! ✅#RR: 13/1 (2.4)#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #MIvRR #TATAIPL https://t.co/oHtlwHEihb pic.twitter.com/y6oADewvIz
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2022
-
दोन षटकात राजस्थानच्या 12 धावा
दोन षटकात राजस्थान रॉयल्सच्या 12 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 11 आणि यशस्वी जैस्वाल एक रन्सवर खेळतोय.
-
जोस बटलरने मिडविकेटला खेचला षटकार
दुसऱ्या षटकातील डॅनियल सॅम्सच्या तिसऱ्या चेंडूवर जोस बटलरने मिडविकेटला सुंदर षटकार खेचला.
-
पहिल्या षटकात चार धावा
राजस्थान रॉयल्सने पहिल्या षटकात चार धावा केल्या आहेत. जोस बटलर चार धावांवर खेळतोय.
-
सामन्याला सुरुवात, जसप्रीत बुमराहचं पहिलं षटक
MI VS RR सामन्याला सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून पहिल षटक टाकतोय. जोस बटलर-यशस्वी जैस्वालची जोडी मैदानात आहे.
-
आज आम्ही चूका सुधारणार – रोहित शर्मा
मागच्या सामन्यात केलेल्या चूका आम्ही या सामन्यात सुधारणार आहोत. आमचा तरुण संघ आहे. प्रत्येक सामन्यातून आम्ही शिकत आहोत, असे रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर सांगितलं.
Rohit: “This game will allow us to correct the mistakes we made last time. We are a young team, learning with every game.”#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #MIvRR #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2022
-
राजस्थान रॉयल्सच्या संघात एक बदल
राजस्थान रॉयल्सच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. नवदीप सैनी राजस्थानसाठी डेब्यू करतोय.
.@navdeepsaini96 debuts in Pink! ?
Can we get a #HallaBol? #MIvRR | #TATAIPL2022 | @Dream11 pic.twitter.com/K3kSLHfWd1
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 2, 2022
-
अशी आहे पलटनची Playing 11
अशी आहे मुंबई इंडियन्सची Playing 11
Paltan, here’s our एक नंबर XI for the Royal clash against RR. ?⚔️
We are going with the same team! ?#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvRR @Dream11 pic.twitter.com/3gS8iu6JTP
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2022
-
मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा निर्णय
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला असून पहिला गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना होत आहे.
Published On - Apr 02,2022 2:58 PM