MI vs RCB : आज हरमनप्रीत विरुद्ध स्मृती, कोण मारणार बाजी?, WPL मध्ये भिडणार टॉप टीम्स
स्मृती मांधनाच्या वाघिणी पहिल्या विजयासाठी आतुर, हरमनप्रीतपण वार करण्यासाठी सज्ज. मुंबईची टीम गुजरात जायंट्स विरुद्ध लीगमधील ओपनिंग मॅच खेळली. या सामन्यात मुंबईने गुजरातवर 143 धावांनी मोठा विजय मिळवला.
MI vs RCB : महिला प्रीमियर लीगमधील स्मृती मांधना महागडी खेळाडू आहे. तिची टीम रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विजयी सुरुवात करण्यासाठी आतूर आहे. रविवारी पहिल्या सामन्यात आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सकडून दारुण पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला 60 धावांनी हरवलं. मांधनाच्या आरसीबीच लक्ष्य आता सोमवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच असेल. आरसीबीसमोर हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सचं आव्हान असेल. मुंबईची टीम गुजरात जायंट्स विरुद्ध लीगमधील ओपनिंग मॅच खेळली. या सामन्यात मुंबईने गुजरातवर 143 धावांनी मोठा विजय मिळवला.
वार करण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज
हरमनप्रीतची टीम दुसऱ्या सामन्यात मांधनाच्या वाघिणींवर वार करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मागच्या पराभवामुळे आरसीबीच्या टीमला झटका बसला आहे. कारण या टीममध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. पहिल्या विजयामुळे मुंबई टीमचा उत्साह वाढला आहे. ही टीम पुन्हा वार करण्यासाठी तयार आहे. पण एका पराभवामुळे आरसीबीची टीम जास्त धोकादायक बनली आहे.
बॅटिंग, बॉलिंग दोन्ही फ्लॉप दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबीची गोलंदाजी फ्लॉप ठरली. रेणुका सिंह, मेगन शूट, प्रीति बोस, एलिस पेरी, सोफी डिवाइन, शोभना आशा या गोलंदाजांची मेग लेनिंग आणि शेफाली वर्माने जोरदार धुलाई केली. हीथर नाइटने 2 विकेट घेतले. तिने बॅटने सुद्धा चांगली कामगिरी केली. नाइटने 34 धावा केल्या. आरसीबीची बॉलिंग फ्लॉप ठरलीच. पण त्याचवेळी फलंदाजीत फक्त 4 बॅट्समननी 30 रन्सचा टप्पा ओलांडला. चांगल्या सुरुवातीनंतर मीडल ऑर्डरला डाव संभाळता आला नाही. मांधना 35, पेरी 31, नाइट 34 आणि शूटने नाबाद 30 धावा केल्या.
मुंबईच बलस्थान काय?
मुंबई विरुद्धच्या सामन्यात आरसीबीला आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. मुंबई बद्दल बोलायच झाल्यास, यास्तिका भाटिया मागच्या सामन्यात फ्लॉप ठरली होती. पण हरमनप्रीतच्या टीमने खराब सुरुवातीनंतर डाव सावरला. सलामीवीर हॅली मॅथ्यूने 47 धावा केल्या, हरमनप्रीतने 30 चेंडूत 65 धावा फटकावल्या. केरने 45 धावा ठोकल्या. हरमनप्रीत आणि केरला रोखण्याचं आरसीबीसमोर मोठं आव्हान असेल. गोलंदाजीत मुंबई टीमची कामगिरी अव्वल होती. साइकाने 11 धावा देऊन 4 विकेट काढल्या. मुंबईच्या टीमने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात आरसीबीपेक्षा सरस कामगिरी केली.